स्टॉकहोम : अति लघुकणांचा (अजिबात जागृती नसलेला) स्वभाव हा कमीलिअन सरड्यासारखा रंग बदलणारा असल्याचा शोध लावणाऱ्या टक्काकी कजिता (जपान) आणि आर्थर मॅकडोनाल्ड (कॅनडा) यांना मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या शोधामुळे अतिसूक्ष्म कणदेखील ढीग स्वरूपात असतात याची अत्यंत महत्त्वाची माहिती यामुळे उपलब्ध झाली आहे.अतिलघुकणांचे तीन प्रकार आहेत आणि या दोन संशोधकांनी ते कण एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात हेलकावे खात असतात हे दाखवून दिले आहे. हे अति लघुकण एकगठ्ठा स्वरूपात नसतात ही अनेक वर्षांपासूनची कल्पना या संशोधनामुळे दूर केली आहे. या संशोधनामुळे वस्तूचे सर्वात आत काम कसे चालते याबद्दलची आमची समज बदलून टाकली असून शिवाय ब्रह्मांडाबद्दलच्या (युनिव्हर्स) आमच्या दृष्टिकोनाला बदलण्यास ती महत्त्वाचे ठरू शकते, असे अकॅडमी म्हणते.टक्काकी कजिता (५६) हे इन्स्टिट्यूट फॉर कॉस्मिक रे रिसर्चचे संचालक व युनिव्हर्सिटी आॅफ टोक्योत प्रोफेसर आहेत. आर्थर मॅकडोनाल्ड (७२) कॅनडात किंग्जस्टन येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीत मानद प्रोफेसर आहेत. या दोघांना बक्षिसादाखल मिळणारे ८ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (९,६०,००० अमेरिकन डॉलर) विभागून मिळतील. याशिवाय दोघांना १० डिसेंबर रोजी होणाऱ्या समारंभात पदविका आणि सुवर्णपदक प्रदान केले जाईल.मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, अतिलघुकण सूर्यापासून पृथ्वीपर्यंतच्या प्रवासात एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलत जातात. हा प्रयोग अतिशय काटेकोरपणे सिद्ध झाला त्या क्षणी मी शोध लागल्याचा आनंदोद््गार काढला.तीन अतिलघुकणांच्या पलीकडेही इतर स्वरूपाचे अतिलघुकण आहेत का यावरही प्रयोग होत आहेत. अतिलघुकणांच्या संशोधनात सहभाग असलेले व २००२ मध्ये भौतिकशास्त्रासाठी नोबेल पुरस्काराने गौरविले गेलेले जपानचे मसातोशी कोशिबा यांच्या विद्यार्थ्यांपैकी एक कजिता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.अतिलघुकण विश्वातून सूं संू आवाज करीत जवळपास प्रकाशाच्या वेगाने जातात तेव्हा ते आपली ओळख बदलतात हे दाखविणाऱ्या प्रयोगांमध्ये या दोन संशोधकांनी खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे, अशा शब्दांत रॉयल स्वीडिश अकॅडमी आॅफ सायन्सेसने त्यांचा गौरव केला आहे. सूर्य आणि ताऱ्यांमध्ये किंवा आण्विक भट्ट्यांमध्ये जसे अतिलघुकण असतात तसेच आण्विक प्रक्रियेमध्ये अतिलघुकण हे अत्यंत लहान कण बनलेले असतात.
भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर
By admin | Published: October 07, 2015 2:56 AM