भारतात डुकराला पाहून अनेक जण नाकाला रुमाल बांधतात किंवा नाक मुरडतात; परंतु विदेशात डुकरांना व्यवस्थित पाळले जाते. दक्षिण चीनमधील हा गमतीशीर पण डुकराच्या मालकिणीला त्रासदायक असा प्रकार उघडकीस आला आहे. तेथे महिलेने डुकराला दत्तक घेतले होते. त्यावेळी त्याचे वजन होते चार किलो. आज तेच डुक्कर १५० किलोचे बनले आहे व त्याने त्या महिलेच्या तोंडाला फेस आणला आहे. त्या डुकराचे झोपेतील घोरणे एवढे मोठ्याने व वेगवान आहे की, त्यामुळे तिला सहा वेळा अपार्टमेंट बदलावे लागले आहे. डुकराच्या घोरण्याचा तिला खूप त्रास होतोय. ती रोज त्याला तीन ते चार वेळा अंघोळ घालते. डुक्कर घोरू लागताच रात्री शेजारचे लोक त्यांची झोप बिघडत असल्यामुळे त्याच्या मालकिणीचे दार वाजवतात. या डुकरामुळे तिला सहा वेळा अपार्टमेंट बदलावे लागले आहे. आता घर बदलण्याऐवजी डुकरालाच घरातून बाहेर काढण्याचा विचार ती करीत आहे. सात वर्षांपूर्वी या महिलेने ती २० वर्षांची होती तेव्हा हे चार किलोचे डुक्कर पाळले होते. एका महिन्यानंतर या डुक्कराचा आहार एवढा वाढला की, समोर जे येईल ते तो फस्त करू लागला. सहा महिन्यांनंतर त्याचे वजन २० किलो झाले. आता त्या महिलेला आपल्याकडून काय चूक झाली याची जाणीव झाली आहे.
डुकराने मालकिणीला घडवला मनस्ताप
By admin | Published: June 05, 2017 4:29 AM