उड्डाणादरम्यान एका प्लेनमध्ये बिघाड झाला. यानंतर पायलटने साधारण 4 हजार फूट उंचीवरून एकतर प्लेनमधून उडी मारली किंवा प्लेनमधून पडला. यात त्याचा मृत्यू झाला. हैराण करणारी बाब ही आहे की, या प्लेनमध्ये असलेला को-पायलटने प्लेनची इमरजन्सी लॅंडिंग केली आणि त्याला हलकी जखम झाली.
23 वर्षीय पायलट चार्ल्स ह्यू क्रुक्सची डेड बॉडी बऱ्याच शोधानंतर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये सापडली. तो एक छोटं प्लेन उडवत होता. ज्यात 10 लोक बसू शकतात. पण यात कोणतेही प्रवासी बसले नव्हते. चार्ल्ससोबत केवळ एक को-पायलट होता.
उड्डाणादरम्यान लॅंडिंग गिअरमध्ये बिघाड झाला होता. यानंतर पायलट प्लेनमधून खाली पडला. नंतर को-पायलटने लोकल-एअरपोर्टवर इमरजन्सी लॅंडिंग केली. मग को-पायलटला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ज्यानंतर त्याला लगेच सुट्टी देण्यात आली.
आता चार्ल्सच्या मृत्यूचं रहस्य आणखीनच गुढ होत चाललं आहे. जोरात आवाज आल्यावर एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला. तिथे बराच शोध घेतल्यानंतर चार्ल्सची बॉडी मिळाली. असं मानलं जात आहे की, प्लेनमध्ये झालेला बिघाड ठीक करण्यादरम्यान तो प्लेनमधून पडला असेल किंवा त्याने उडी मारली असेल. त्याने पॅराशूटही घातला नव्हता.
या घटनेमुळे चार्ल्सच्या वडिलांना खूप धक्का बसला आहे. ते म्हणाले की, चार्ल्सने त्यांना नुकतंच सांगितलं होतं की, तो त्याच्या कामामुळे खूप खूश आहे. ह्यू म्हणाले की, त्यांच्या मुलाचा मृत्यू त्यांच्यासाठी एक रहस्य आहे.
घटनेबाबत वेक काउंटी इमरजन्सी मॅनेजमेंटचे ऑपरेशन मॅनेजर दर्शन पटेल यांनी सांगितलं की, त्यांना याची माहिती नाही की, चार्ल्सने प्लेनमधून उडी मारली की तो पडला. फ्लाइट मॅपनुसार, घटनेवेळी प्लेन 3,850 फूट उंचीवर होतं.