हाँगकाँग : सदबीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका लिलावामध्ये एक गुलाबी हिरा तब्बल ४६२ कोटी रुपयांना विकला गेला. चॉव ताई फूक इन्टरप्रायझेसने बोली लावून हा पिंक स्टार हिरा विकत घेतला.लिलावासाठी उपलब्ध असलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पॉलिश हिरा आहे. यापूर्वी ओपनहायमर ब्लू हा हिरा सर्वाधिक किमतीत विकला गेला होता. मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या लिलावात तो हिरा २३५ कोटी रुपयांना विकला गेला होता. १९९९ साली डी बीयर्स या प्रख्यात कंपनीने आफ्रिकेच्या बोत्सवानामधील खाणीतून हा हिरा शोधला होता. नंतर स्टेनमेट्झ डायमंड्सने दोन वर्षांत त्याला पैलू पाडून चमकावले. त्यामुळे सुरुवातील १३२.५ कॅरेटचा असलेला हा हिरा पैलू पाडून पॉलिश केल्यानंतर ५९. ६ कॅरेटचा झाला. >59.6 कॅरेटचा अंड्याच्या आकाराचा हा पिंक स्टार हिरा लिलावला सुरुवात होताच, पाच मिनिटांमध्ये विकला गेला. 2013 साली जीनिव्हामध्ये झालेल्या लिलावात या हिऱ्याला ८.३ कोटी डॉलरची बोली लागली होती, पण खरेदीदाराला तेवढे पैसे देता आले नाहीत. इतिहासातील हा सर्वात मोठा गुलाबी हिरा आहे. रंगामुळे हिऱ्याला विशेष महत्त्व आहे. या स्टार पिंक हिऱ्याची किंमत सुमारे सहा कोटी डॉलर असेल, असा अंदाज होता. - अलेक्झांडर ब्रेकनर (हिऱ्यांचे विक्रेते)
४६२ कोटी रुपयांत विकला गुलाबी हिरा
By admin | Published: April 06, 2017 4:31 AM