शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

चीनने LACवर सर्व ताकद लावली पणाला, 50 हजार सैनिक, क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, लढाऊ विमानं तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 10:58 AM

पीएलए कोणत्याही रणनीतीनुसार कारवाई करण्याची तयारी करत नाही.

बीजिंगः पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचलेला आहे. रशिया येथे सुरू असलेल्या SCO शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांचे नेते बैठक घेत आहेत. दुसरीकडे चीनने वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)वर युद्धासारखी तयारी सुरू केली आहे. चीनने या भागात 50,000 सैन्य तैनात केले आहे. येथे मोठ्या प्रमाणात विमान आणि क्षेपणास्त्रही बसविण्यात आली आहेत. त्याचबरोबर भारतीय सैन्य आपल्या फॉरवर्ड पोस्ट्स चीन मार्गक्रमणा करत तर नाही ना, यावर लक्ष ठेवून आहे. चीनच्या हालचाली केवळ ताकद दाखवण्यासाठी आहेत. पीएलए कोणत्याही रणनीतीनुसार कारवाई करण्याची तयारी करत नाही. अर्थातच सीमेवर सशस्त्र चकमकींसाठी ते नक्कीच तयार असतील.चीनने येथे जमिनीवर हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र, रॉकेट फोर्स आणि 150 लढाऊ विमानंही तैनात केली आहेत. हे सर्व LACवरील हल्ल्याच्या रेंजमध्ये स्थित आहेत. या प्रदेशातील ही सर्वोच्च सैन्य तैनाती असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मेपासून चीनचा भारताबरोबर तणाव वाढत चालला आहे. तिथे स्थानिक कमांडर नसून पीएलए थेट बीजिंगकडून नियंत्रित केले जात आहे, असे मानले जाते.बीजिंगच्या हालचालींवर दररोज देखरेखबीजिंगच्या आदेशानुसार, दररोज पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील चिनी सैनिक भारतीय परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पीएलए सीमेच्या बाजूने हलके टँक आणि पायदळ लढाऊ वाहने पाठविण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यास भारतीय सैन्याने थांबवले होते. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी(PLA)ने  या प्रदेशात अवजड सैन्य आणि शस्त्रे तैनात करण्याची प्रक्रिया वाढवली आहे. देशाच्या विविध भागांतून सैन्य मागविण्यात येत आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने सुरक्षा विश्लेषकांचा हवाला देत असे म्हटले आहे की, हवाई संरक्षण, सशस्त्र वाहने, पॅराट्रूपर्स, विशेष सैन्य आणि पायदळ देशभरातून बोलावून या भागात तैनात करण्यात आले आहे.एच-6 बॉम्बरदेखील सज्जपीएलएच्या सेंट्रल थिएटर कमांडचा एच -6 बॉम्बर आणि वाय -20 वाहतूक विमानं येथे प्रशिक्षण मिशनसाठी तैनात आहेत. लांब पल्ल्याची ऑपरेशन्स, कवायती आणि लाइव्ह-फायर ड्रिल अनेक आठवडे सुरू असतात. वायव्य चीनच्या वाळवंटात आणि नैर्ऋत्य चीनच्या तिबेट प्रदेशात ही कारवाई केली जात आहे. चायना सेंट्रल टेलिव्हिजनने (सीसीटीव्ही) गेल्या आठवड्यात दावा केला की, पीएलएच्या 71व्या गटाच्या लष्कराची HJ-10 अँटी टँक क्षेपणास्त्र यंत्रणा पूर्व चीनच्या जिआंग्सु प्रांतातून गोबी वाळवंटात आली होती.तिबेट मिलिटरी कमांडने केला सरावपीएलएच्या तिबेट सैन्य कमांडने 4,500 मीटर उंचीवर संयुक्त ब्रिगेड स्ट्राइक अभ्यास केला आहे. पीएलएची 72वी सैन्य गटाची तुकडी वायव्येकडे दाखल झाली आहे आणि त्याच्या हवाई संरक्षण दलाने विमानविरोधी बंदूक आणि क्षेपणास्त्रांवर सरावासह लाइव्ह-फायर ड्रील देखील चालवल्या आहेत.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत