शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

Plague: 600 वर्षांपूर्वी 'या' देशातून प्लेगचा आजार पसरला, शास्त्रज्ञांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 3:28 PM

Plague origion: प्लेगच्या साथीमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत प्लेगच्या प्रसाराबाबत अनेक दावे करण्यात आले होते, परंतु आता शास्त्रज्ञांनी या आजाराबाबत नवीन माहिती समोर आणली आहे.

Plague origion: मानवी संस्कृतीच्या इतिहासात वेगवेगळ्या कालखंडात उद्भवलेल्या साथीच्या रोगांचा मानवी जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. कोरोनापूर्वी, स्पॅनिश फ्लू आणि प्लेगसारख्या जागतिक महामारीने लाखो लोकांचा बळी घेतला होता. यातच आता शास्त्रज्ञांनी प्लेगच्या साथीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आणली आहे.

प्लेगची महामारी कधी आणि कुठे पसरली?मध्यपूर्वेतील एका प्रसिद्ध रेशीम व्यापार मार्गाजवळ सापडलेल्या स्मशानभूमीत शेकडो वर्षांपूर्वी सापडलेल्या सांगाड्यांचे परीक्षण करून, शास्त्रज्ञांनी 14 व्या शतकात ब्लॅक डेथची महामारी कशी सुरू झाली, हे शोधून काढले आहे. खरेतर, उत्खननादरम्यान सापडलेल्या सांगाड्यांच्या डीएनए तपासणीतून 600 वर्षांहून अधिक जुने रहस्य उघड झाले आहे. याची जगाला आजपर्यंत माहिती नव्हती. 14 व्या शतकात प्लेगच्या साथीने जगात प्रचंड विनाश घडवून आणला होता, त्यामुळे त्या काळातही करोडो लोकांचा मृत्यू झाला होता.

जगातील पहिला प्लेग रुग्ण कधी सापडला?रॉयटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्कॉटलंडमधील स्टर्लिंग विद्यापीठ, जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट आणि ट्युबिंगेन विद्यापीठाच्या संशोधन पथकाने किर्गिझस्तानमधील स्मशानभूमीतून सापडलेल्या डीएनएचे विश्लेषण केले आणि असे आढळले की मध्य आशियामध्ये प्लेगची साथ सुरू झाली. शेकडो वर्षांपूर्वी येथे पुरलेल्या लोकांच्या दातांमध्ये प्लेग निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा डीएनए संशोधकांना सापडला आहे. संशोधकांनी असेही सांगितले की, एका दशकापेक्षा कमी कालावधीत ही महामारी जगभर पसरली आहे.

प्लेगचा प्रसार उंदरांनी नव्हे तर मानवाने केलाया संशोधनाचा अहवाल जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासाचे सह-लेखक आणि स्टर्लिंग युनिव्हर्सिटीचे इतिहासकार फिलिप स्लाव्हिन म्हणतात की, आमच्या शोधानंतर प्लेग महामारीबद्दल शतकानुशतके जुने वादविवाद आणि सिद्धांत अप्रासंगिक बनले आहेत. या संशोधनात असेही सांगण्यात आले होते की, ही महामारी उंदरांच्या माध्यमातून नव्हे तर मानवातून जगभरात पसरली होती.

त्याचा उद्रेक अनेक शतके टिकलाअभ्यास पथकाच्या मते, ही महामारी शेकडो वर्षांपासून लोकांचा बळी घेत आहे. परिस्थिती अशी होती की प्लेगचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच त्याची भीती पसरली होती. एका अहवालानुसार, शेकडो वर्षांपूर्वी लंडनमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी मृतदेह पुरण्यासाठी मोठी जागा सोडण्यात आली होती. अहवालात असेही म्हटले आहे की, प्लेग ज्या शहरात पसरला, तेथील 50-60 टक्के लोकसंख्या नष्ट झाली. या महामारीमुळे सर्वाधिक मृत्यू युरोप आणि मध्य पूर्वमध्ये झाले आहेत. इराण आणि मध्य आशियातील लाखो लोकांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स