अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आज एक विचित्र अपघात घडला आहे. लँडिंगवेळी दोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आहेत. या अपघातात किती जण ठार झालेत याची माहिती मिळालेली नाही.
ही दोन्ही विमाने छोटेखानी होती. रनवेवर दोन्ही विमानांनी एकाच वेळी उतरण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी हवेतच या दोन विमानांची टक्कर झाली. कॅलिफोर्नियाच्या वाटसनविले शहरात हा अपघात झाला. स्थानिक विमानतळावर ही विमाने उतरण्याचा प्रयत्न करत होती. ही दोन आणि तीन सीटर विमाने होती. यामध्ये किती लोक होते, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच मृत्यू किंवा जखमींची माहिती देखील देण्यात आलेली नाही.
ट्विट पोस्ट करून एका अधिकृत घोषणेत याची माहिती देण्यात आली. वाटसनविले म्युनिसिपलचे पथक विमान तळावर पोहोचले आहेत. हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघाताच्या कारणांचा तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. दिवसभरात अधिक माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे शहर प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.