लॉस अँजिलोस- प्रसिद्ध अॅडल्ट मॅगझिन 'प्लेबॉय'चे संस्थापक ह्यूग हेफनर यांचं निधन झालं आहे. 91 वर्षीय ह्यू हफनर यांनी बुधवारी रात्री अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. प्लेबॉय एंटरप्रायजेसने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून याबद्दलची माहिती दिली आहे. ह्यूग हेफनर यांनी 1960च्या दशकात सेक्स आणि लैगिक विषयांबद्दलच्या पारंपरिक विचारांची असणारी चौकट मोडून काढली. त्यांच्या पुरूषांसाठी तयार केलेल्या खास मासिकातून त्यांनी या नव्या जीवनशैलीबद्दल सांगायला सुरूवात केली. याच मासिकाच्या बळावर त्यांनी स्वतःचं एक व्यवसाय साम्राज्य तयार केलं होतं. ह्यूग हेफनर हे हेफ या नावानेही ओळखले जात होते. गेल्या काही दिवसांपासून हफनर आजारी असल्याने ते प्रसारमाध्यमांपासून दूर होते. ऑगस्टमध्ये प्लेबॉयच्या झालेल्या वार्षीक कार्यक्रमातही ह्यूग हेफनर गैरहजर होते. रेड स्मोकिंग जॅकेट आणि हातात पाईप अशी ही हफनर यांची ओळख होती.
१९५३ मध्ये ह्यूग हेफनर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. मासिकातील नग्न छायाचित्रे, अतिधीट विषयांवरील चर्चा आणि मुलाखती यामुळे साहित्य विश्वात मोठे वादळ निर्माण झाले. मात्र, त्यानंतर तब्बल दोन दशके हे मासिक साहित्यिक विश्वात कायम चर्चेचा विषय राहिले होते.
ह्यूग हेफनर यांचा जन्म शिकागोमध्ये झाला होता. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर हफनर ऑर्मीमध्ये क्लर्क पदावर कार्यरत होते. ह्यू हफनर यांनी 'एस्क्वायर' मासिकात कॉपी रायटर म्हणून काम केलं आहे. प्लेबॉय एंटरप्रायजेस आता टेलिव्हिजन नेटवर्क, वेबसाइट, मोबाइल अॅप्लिकेशन आणि रेडिओच्या माध्यमातून अॅडल्ट कंटेन्ट पोहचविण्याचं काम करतं आहे. 1953 मध्ये मासिकाच्या लॉन्चच्या सात वर्षानंतर हफनर यांनी प्लेबॉय क्लब सुरू केला. हफनर हे बर्टन ब्राउनच्या गॅसलाइट क्लबने प्रभावित होते म्हणूनच त्यांनी प्ले बॉय क्लबची सुरूवात केली, असं बोललं जातं.
सुरवातीला प्लेबॉय क्लबची वर्षाची मेंबरशिप फी 25 डॉलर्स इतकी होती. क्लबला सुरूवातीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर हफनरने लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजिलॉस, डेट्रॉइट, सेनफ्रान्सिस्को, बोस्टन, सेंट लुइस, लास वेगास अशा अनेक ठिकाणी क्लबची सुरूवात केली होती. त्यानंतर हळुहळु दुनियाभरात प्लेबॉयचे क्लब सुरू केले गेले. काही शहरात प्लेबॉय क्लबच्या शाखा बंद झाल्या आहेत. तर काही ठिकाणी नव्या शाखा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. भारतात गोवा, हैदराबाद आणि मुंबईत प्लेबॉय क्लबच्या शाळा सुरू करण्याची योजना आहे पण काही संघटनांचा त्याला विरोध असल्याने त्या योजनेवर अजून काम सुरू करण्यात आलेलं नाही.
प्लेबॉय मासिकाची सुरूवात१९५३ मध्ये ह्यूग हेफनर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली होती. मासिकातील नग्न छायाचित्रं, त्यातील मुलाखती या सगळ्यामुले साहित्य विश्वात मोठं वादळ निर्माण झालं होतं. पण सगळ्या वादानंतरही तब्बल दोन दशकं हे मासिक कायम चर्चेचा विषय राहिलं. साहित्य, समाज आणि पारंपरिक अमेरिकी विचारधारा यांची चौकट मोडत प्लेबॉय ह्यूग हेफनर यांच्या मासिकाचा १९५३ सालापासून जगभर प्रसार झाला. जागतिकीकरणाआधी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गोष्टींपैकी एक म्हणून या मासिकाची नोंद केली जाते. याशिवाय, ह्यूग हेफनर अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्याच्या चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. अमेरिकेतील टपाल विभागाने ‘प्लेबॉय’ मासिक घरपोच देण्यास नकार दिल्यानंतर ह्यूज हेफनर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
भारतीय मॉडेल शर्लिन चोपडा दिसली होती प्लेबॉयच्या कव्हर पेजवर
प्लेबॉय या मॅगझिनच्या कव्हर पेजवर भारतातील एकमेव मॉडेल झळकली होती. शर्लिन चोपडा हिने प्लेबॉय मॅगझिनसाठी न्यूड शूट केलं होतं. 2012मध्ये शर्लिन चोपडाने प्लेबॉयच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटो शूट केलं होतं. त्यानंतर शर्लिन खूप चर्चेत आली होती. आज प्लेबॉय मॅगझिनचे संस्थापक ह्यूग हेफनर यांच्या निधनाच्या बातमीनंतर शर्लिनने त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. असं ट्विट मॉडेल शर्लिन चोपडाने केलं आहे.