लंडन : प्लुटो लघु ग्रहावरील पृष्ठभागाच्या खालील समुद्र हा जीव तग धरेल इतका स्वागतशील असू शकतो, असे इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ ब्रायन कोक्स यांनी म्हटले आहे.आमच्या या आकाशगंगेत मानव हाच एकमेव गुंतागुंतीचा जीव असावा, असेही त्यांचे म्हणणे आहे. ‘न्यू होरिझोन्स’ या नावाच्या अंतरिक्ष यानाने जुलै महिन्यात केलेल्या अभ्यासात प्लुटो लघु ग्रहावरील पृष्ठभागाखालील समुद्रात (पृथ्वीवरील जीवसृष्टीबद्दलची आमची जी समज आहे ती किंचितही बरोबर असेल तर) तुम्हाला सजीव गोष्टी सापडू शकतील, असे दाखविले, असे ब्रायन कोक्स यांनी ‘द टाइम्स’ला सांगितले. प्लुटोच्या पृष्ठभागावर हिमनदीचा पाझर असे संकेत देतोय की जमिनीखालचा समुद्र हा रसायनशास्त्राला आश्रय देणारा आहे, असे कोक्स यांना वाटते. (वृत्तसंस्था)
‘प्लुटो’वर असू शकते सजीव सृष्टी
By admin | Published: September 01, 2015 11:09 PM