वॉशिंग्टन : नासाचे अवकाश यान ‘न्यू होरीझोन्स’ने सूर्याभोवती नऊ वर्षांची भ्रमंती केल्यानंतर ‘प्लुटो’ आणि त्याचा सर्वांत मोठा चंद्र ‘शारोन’चे पहिले रंगीत छायाचित्र पाठविले आहे. अवकाश संशोधनातील ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासाने सांगितले की, साडेअकरा कोटी किलोमीटर अंतरावरून नऊ एप्रिल रोजी या यानाने हे छायाचित्र टिपले. नव्या छायाचित्रात प्लुटो आणि शारोन यांची माहिती मिळते. ‘न्यू होरीझोन्स’ १४ जुलै रोजी प्लुटो प्रणालीपासून जाणार असून या ग्रहावर जाणारे हे पहिले अवकाश यान म्हणून ओळखले जाईल. नासाच्या ग्रहविज्ञान विभागाचे संचालक जिम ग्रीन म्हणाले, छायाचित्र प्लुटोचे एक विस्मयकारी दर्शन घडविते. प्लुटो आणि शारोन यांच्यातील फरक हा तात्काळ जाणवण्यासारखा नाही. (वृत्तसंस्था)प्लुटोच्या तुलनेत शारोन हा धूसर आहे. ही तफावत दोन्हींच्या संरचनेतील फरकामुळेच असण्याची शक्यता आहे. अथवा शारोनवर आतापर्यंत न दिसलेल्या वातावरणामुळेही असू शकेल, असे त्यांनी सांगितले.स्पेस डॉट कॉमच्या वृत्तानुसार, यंदा उन्हाळ्यात ‘न्यू होरीझोन्स’ दोन्ही खूप दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसू शकतील. तेव्हा ही अनिश्चितता दूर होईल.‘संपूर्ण जगाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी मानवाकडे असलेली पहिली संधी म्हणून आम्ही प्लुटोवर गेलो,’ अशी प्रतिक्रिया ‘न्यू होरीझोन्स’ मोहिमेचे सह-संशोधक विल्यम मॅककिन्नो यांनी दिली.दुर्बिणीनेच हा ग्रह पाहता येतो. सूर्याभोवती तो दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. तसेच आपल्या कक्षेत फिरत असताना तो नेपच्यूनच्या कक्षेहूनही सूर्याजवळ येतो. आपल्या चंद्राच्या दोन तृतीयांश एवढा प्लुटोचा आकार आहे. ४‘न्यू होरीझोन्स’ने १९ जानेवारी २००६ रोजी भ्रमंती सुरू केली. ४प्लुटो हा सूर्यमालेतील नववा आणि शेवटचा ग्रह आहे. ४शारोन हा प्लुटोपेक्षा ५० टक्क्याने छोटा आहे. सुमारे ८५ वर्षांपूर्वी म्हणजेच १८ फेब्रुवारी १९३० रोजी प्लुटोचा शोध लागला होता.
नासाच्या यानाने पाठविली प्लुटोची पहिली रंगीत छबी
By admin | Published: April 16, 2015 11:50 PM