नवी दिल्ली/कॅनबेरा: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वाची बैठक घेतली. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी चीनला अप्रत्यक्षपणे कठोर इशारा दिला. चीननं इतर देशांचं सार्वभौतत्व राखावं, अशी अपेक्षा दोन्ही पंतप्रधानांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी हिंदी महासागरातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा करार केला. त्यामुळे यापुढे भारत आणि ऑस्ट्रेलियाला एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करता येईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाचं भौगोलिक स्थान पाहता दोन्ही देशांनी केलेला करार सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे आता भारत आणि ऑस्ट्रेलियाची लढाऊ जहाजं आणि विमानं एकमेकांच्या तळांचा वापर करू शकतील. याशिवाय जहाजं आणि विमानांना एकमेकांच्या तळांवरील इंधनसाठादेखील वापरता येईल. हिंदी महासागरात चीनचा वावर वाढला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑस्ट्रेलियासोबत करार केला आहे. अशाच स्वरुपाचा करार याआधी भारतानं अमेरिकेसोबत केला आहे. ऑस्ट्रेलियाहून चीनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनांची निर्यात होते. त्यामुळे चीन ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा आहे. मात्र कोरोनावरून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे. कोरोना प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी ऑस्ट्रेलियानं केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत ऑस्ट्रेलियानं युरोपियन युनियननं मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यामुळे चीननं संताप व्यक्त केला. ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा असल्याची भाषा चीनकडून वापरण्यात आली. ऑस्ट्रेलियाला आर्थिकदृष्ट्या धक्का देण्यासाठी चीननं त्यांच्याकडून येणाऱ्या सामानावरील आयात शुल्कात ८० टक्क्यांची वाढ केली. ऑस्ट्रेलियाच्या चार कत्तलखान्यांमधून येणाऱ्या गोमांसावरही चीननं निर्बंध लादले. लेबलिंगचा मुद्दा उपस्थित करत चीननं ऑस्ट्रेलियावरून येणाऱ्या गोमांसावर थेट बंदी घातली. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. हा तणाव दिवसागणिक वाढतच आहे.अमेरिकेत आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबनाकोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार'मिशन बिगिन अगेन'च्या नियमांत महत्त्वाचा बदल; लाखो नागरिकांचा प्रवास होणार सुलभजगात भारी! जगातील सर्वात मोठं कडीपत्त्याचं झाड; भारतीय शेतकऱ्याचं नाव गिनीज बुकात
CoronaVirus News: चीनला धडा शिकवण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लान; समुद्रात ड्रॅगनला भारी पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 5:23 PM