पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड लीडर्सच्या शिखर सम्मेलनासाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. टोकियोमध्ये त्यांचे जबरदस्त स्वागत झाले. यावेळी हजारो भारतीयांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दरम्यान, एका हॉटेलमध्ये जपानच्या मुलांनीही पंतप्रधान मोदींचे अनोख्या अंदाजात स्वागत केले. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.
जपानी मुलगा हिंदीत बोलला- टोकियो येथे पोहोचल्यानंतर, अनेक मुले पीएम मोदींच्या स्वागतासाठी पोहोचले होते. ही मुले हातात पेंटिंग घेऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत करत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी या मुलांच्या पेंटिंग्सवर ऑटोग्राफही दिले. यावेळी या मुलांनी पंतप्रधान मोदींसोबत हिंदी भाषेत संवाद साधला. यावर मोदी म्हणाले, 'व्वा! तू हिंदी कुठून शिकलास? फार छान समजतं.'
लोकांनी केलं जबरदस्त स्वागत -टोकियोमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना तेथील भारतीय नागरिकांनी 'जय श्री राम' आणि 'भारत माता की जय', अशा घोषणा दिल्या. याच वेळी मोदींना 'भारत मां का शेर' असेही संबोधण्यात आले. लोक त्यांच्या स्वागतासाठी हातात पोस्टर्स घेऊन उभे होते. यावर "जो 370 को मिटाए हैं, वो टोक्यो आए हैं," असे लिहण्यात आले होते.
दौऱ्यासंदर्भात मोदी म्हणाले... -या दौऱ्यासंदर्भात बोलताना पीएम मोदी म्हणाले, 'जपानचे पंतप्रधान श्री फुमियो किशिदा यांनी दिलेल्या निमंत्रणावरून, आपण 23-24 मे 2022 रोजी टोकियोचा दौरा करणार आहोत. मार्च 2022 मध्ये, पंतप्रधान किशिदा यांनी आपल्याला 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर सम्मेलनासाठी निमंत्रण पाठविले होते. आपल्या या दौऱ्यात, भारत-जपान दरम्यानची धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी बळकट करण्यासाठी दोन्ही देशांतील संवाद चांगल्या पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे.