शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

PM Modi Jacket: G-7 समिटमध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या जॅकेटची चर्चा; जगाला दिला महत्वाचा संदेश...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 5:53 PM

PM Modi In Hiroshima: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या विशेष निमंत्रणावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी हिरोशिमाला पोहोचले.

PM Modi Attire In G7 Summit: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या विशेष निमंत्रणावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी हिरोशिमाला पोहोचले. यादरम्यान पीएम मोदींच्या अनेक फोटो आणि व्हिडिओंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात पंतप्रधान मोदींचे जॅकेट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात त्यांनी G-7 च्या व्यासपीठावरुन जगाला एक खास संदेशही दिला आहे.

पीएम नरेंद्र मोदींनी शिखर G-7 परिषदेत रिसायकल मटेरियलपासून बनवलेले जॅकेट घातले होते. जॅकेट तयार करण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. पीएमचे जॅकेट बनवण्यासाठी वापरलेल्या बाटल्या एकत्र करुन वितळवण्यात आल्या आणि त्यात रंग मिसळून सूत तयार केले गेले. अशा प्रकारे जुन्या प्लास्टिकचा वापर करून जॅकेट तयार करण्यात आले.

पंतप्रधान मोदींचा जगाला संदेशयाआधी 8 फेब्रुवारी 2023 रोजी पीएम मोदींनी अशाच प्रकारचे फिकट निळ्या रंगाचे जॅकेट घालून लोकसभेत पोहोचले होते. प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून ते जॅकेट तयार करण्यात आले होते. हिरोशिमा येथे झालेल्या G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी अनेक संकटांवर मात करण्यासाठी एकत्र काम करण्यावर भर दिला. परिषदेच्या विशेष सत्रात त्यांनी जगाला नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्याचा संदेश दिला. 

नैसर्गिक शेतीवरही भर 

पीएम मोदी म्हणाले, माझा विश्वास आहे की, विकास मॉडेलने विकासाचा मार्ग दाखवला पाहिजे. विकसनशील देशांच्या प्रगतीत हा अडथळा बनू नये. त्याचबरोबर खतांना पर्याय म्हणून नैसर्गिक शेतीचे नवे मॉडेल जगभरात निर्माण करण्याचा त्यांनी आग्रह धरला. तसेच, डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ जगातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJapanजपानInternationalआंतरराष्ट्रीय