PM Modi In BRICS Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील कझान येथे आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेतून जगाला शांततेचा संदेश दिला. तसेच, ही परिषद आयोजित केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती क्विदिमीर पुतिन यांचे आभारही मानले. मला खूप आनंद होत आहे की, आज आपण एका विस्तारित ब्रिक्स कुटुंबाच्या रुपात प्रथमच भेटत आहोत. ब्रिक्स परिवाराशी संबंधित सर्व नवीन सदस्य आणि मित्रांचे मी मनापासून स्वागत करतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.
मोदींचा दहशतवादावर प्रहारपंतप्रधान मोधी पुढे म्हणतात, आम्ही(भारत) युद्धाला नाही, तर सुसंवाद आणि मुत्सद्देगिरीचे समर्थन करतो. आम्ही एकत्रितपणे कोव्हिडसारख्या आव्हानाला पराभूत केले. आता ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा जगभरात अनेक ठिकाणी युद्ध, संघर्ष, आर्थिक अनिश्चितता, हवामान बदल, दहशतवाद अशा घटना घडत आहेत. जगात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम तोडण्याची चर्चा सुरू आहे.
ब्रिक्स हा फूट पाडणारा नाही, तर सार्वजनिक हित जवणारा गट
महागाई रोखणे, अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, जल सुरक्षा हे सर्व देशांसाठी प्राधान्याचे विषय आहेत. तसेच, या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर सुरक्षा, फेक न्यूज इत्यादी नवीन आव्हाने बनली आहेत. अशा परिस्थितीत ब्रिक्सकडून अनेक अपेक्षा आहेत. माझा विश्वास आहे की, एक वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून ब्रिक्स सर्व मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका बजावू शकते. या संदर्भात आपला दृष्टिकोन लोककेंद्रित राहिला पाहिजे. आपण जगाला हा संदेश द्यायला हवा की, ब्रिक्स हा फुटीरतावादी नसून सार्वजनिक हिताचा समूह आहे, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.
दहशतवादावर मोदींची कठोर टिप्पणीदहशतवादावर बोलताना पीएम मोदी म्हणतात, दहशतवाद आणि दहशतवादी फंडिंगचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकमताने एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे. अशा गंभीर विषयावर दुटप्पीपणाला जागा नाही. आपल्या देशातील तरुणांमध्ये कट्टरतावाद रोखण्यासाठी आपण सक्रिय पावले उचलली पाहिजेत. संयुक्त राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक अधिवेशनाच्या प्रलंबित मुद्द्यावर आम्हाला एकत्र काम करावे लागेल. त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा, सुरक्षित आणि सुरक्षित एआयसाठी जागतिक नियमांसाठी काम केले पाहिजे.