PM Modi in G20: पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेसाठी ब्राझील दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेतल्या. तसेच, G20 च्या मंचावरुन जगात सुरू असलेल्या संघर्षांवरुन धोक्याचा इशाराही दिला. याबाबत आपली चिंता व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी 3F संकटावर लक्ष केंद्रित केले.
पीएम मोदी म्हणाले की, जागतिक संघर्षांमुळे अन्न, इंधन आणि खतांच्या (Food, Fuel and Fertilizers) संकटामुळे ग्लोबल साउथचे देश सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. G-20 ने या देशांच्या चिंतांना प्राधान्य दिले पाहिजे. ग्लोबल साउथमध्ये भारत, चीन, ब्राझील आणि सौदी आणि कतार या देशांचा समावेश आहे.
इतर देशांच्या युद्धांचा परिणाम ग्लोबल साऊथवर होत आहे, त्यामुळे ग्लोबल साऊथच्या मुद्द्यांवर प्रथम लक्ष द्यायला हवे, असे नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. G-20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी आपल्या भाषणात मोदींनी G-20 मध्ये भारताने घेतलेले 'लोककेंद्रित निर्णय' पुढे नेल्याबद्दल ब्राझीलच्या अध्यक्षांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, भारतीय G-20 अध्यक्षांच्या 'वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर' या आवाहनाची रिओत चर्चा होती.
PM मोदींनी G-20 उपक्रमाच्या 'भूक आणि गरीबी विरुद्ध लढा'ला भारताचा पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “भारत या प्रयत्नाला पूर्ण पाठिंबा देतो.”
उपासमारीसाठी भारताचा पुढाकारआफ्रिका आणि इतरत्र अन्न सुरक्षा बळकट करण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले, “800 दशलक्षाहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे, 550 दशलक्ष लोक जगातील सर्वात वंचित भागात राहतात. आता 70 वर्षांवरील 6 कोटी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेऊ शकतात."