ने पी ताव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 12व्या आशियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी म्यानमार येथे दाखल झाले असून, या परिषदेतील 10 सदस्य देशांशी संबंध बळकट करण्याची भूमिका ते येथे मांडतील, असे अपेक्षित आहे.
बुधवारपासून ही परिषद सुरूहोत असून, सदस्य राष्ट्रात परस्पर संबंध वाढावेत अशी मोदी यांची इच्छा आहे. म्यानमारच्या राजधानीत नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी आले. त्यांची 1क् दिवसांची तीन देशांचा दौरा सुरू झाला. येथूनच ते ऑस्ट्रेलियात जी-2क् परिषदेसाठी जातील. या परिषदेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट व फिजीचे पंतप्रधान जे व्ही बैनीमारामा यांच्याशी ते बोलतील. म्यानमारचे आरोग्यमंत्री थान आँग यांनी ने पी ताव आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोदी यांचे स्वागत
केले. (वृत्तसंस्था)