शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

PM Modi Papua New Guinea Visit: PM नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीत दाखल, PM जेम्स मारापेंनी पाया पडून घेतले आशिर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 6:54 PM

PM Modi In Papua New Guinea: पंतप्रधान नरेंद्र मोदी FIPIC शिखर परिषदेसाठी पापुआ न्यू गिनीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

PM Modi Papua New Guinea Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यांच्या सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पीएम मोदी रविवारी (21 मे) पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) येथे पोहोचले. FIPIC परिषदेत सहभागी होण्यासाठी PM मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचताच पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी पंतप्रधान जेम्स मारापे (James Marape) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेतला.

पापुआ न्यू गिनी येथील मोरेस्बी (जॅक्सन) आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे पारंपारिक पद्धतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय उपस्थित होते. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पंतप्रधान 22 मे रोजी पापुआ न्यू गिनी येथे FIPIC शिखर परिषदेत सहभागी होतील. 

FIPIC ची स्थापना 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान झाली होती. आतापर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा पापुआ न्यू गिनीला ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधान मोदी जपानवरुन थेट पापुआ न्यू गिनीत दाखल झाले. यापूर्वी त्यांनी जपानमध्ये G-7 शिखर परिषदेत भाग घेतला आणि अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. 

14 देशांचे नेते सहभागी होणार FIPIC परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे हे सर्व क्वचितच एकत्र येतील. FIPIC मध्ये कुक आयलंड, फिजी, किरिबाटी, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नाउरू, नियू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा, तुवालू आणि वानुआतु यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी मरापे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब डेड यांचीही भेट घेतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीयBJPभाजपा