नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 05:43 PM2024-08-22T17:43:10+5:302024-08-22T17:46:47+5:30

PM Modi Security in Ukraine: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत.

PM Modi Security in Ukraine How will the Prime Minister's security be in the war zone | नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या...

नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या...


PM Modi Security in Ukraine : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. पोलंडच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर, पीएम मोदी आज ट्रेनने युक्रेनला जाणार आहेत. युक्रेनला भेट देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. पंतप्रधान जेव्हा देशाबाहेर जातात, तेव्हा त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था केली जाते. पण, युक्रेनसारख्या युद्धजन्य देशात त्यांची सुरक्षा कशी असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊ...

पंतप्रधानांचे सुरक्षेत कोण असतात?
भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) कडे आहे. भारतासह परदेशातही पंतप्रधानांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही एसपीजीकडे असते. एसपीजीची एक टीमही पंतप्रधानांसोबत परदेशात जाते. एसपीजीच्या ब्लू बुक प्रोटोकॉलच्या आधारे पंतप्रधानांच्या दौऱ्याचे योजना, पंतप्रधानांच्या निवासाची व्यवस्था, कार्यक्रम इत्यादी तयार केले जातात.

परदेशात व्यवस्था कशी केली जाते?
पंतप्रधान देशाबाहेर जातात, तेव्हा एसपीजी ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझन टीम त्या देशात जाते आणि पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी तपास करते. दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांची व्यवस्था आणि इतर सर्व बाबी तपासल्यानंतर दौऱ्याची रुपरेषा ठरवली जाते. परदेशात SPG चे कमांडो पूर्णवेळ पंतप्रधानांच्या सोबत असतात. 

युक्रेनमध्ये कशी असेल व्यवस्था ?
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी एसपीजी कमांडोसह युक्रेनचे सुरक्षा दल तैनात केले जाईल. तेथील सुरक्षेची जबाबदारी युक्रेनची आहे. पण, एसपीजी कमांडोज पंतप्रधानांच्या अगदी जवळ असतील. पीएम मोदी ज्या ट्रेनमधून प्रवास करणार आहेत, त्या ट्रेनमध्ये पाळत ठेवणारी यंत्रणा, सुरक्षित नेटवर्क आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची विशेष टीम आहे. या सुरक्षा यंत्रणांद्वारे ट्रेनबाहेरील परिस्थितीची विशेष काळजी घेतली जाते.

पंतप्रधानांनी युद्धावर व्यक्त केली चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, पोलंडसोबतच्या संबंधांना विशेष महत्त्व आहे. भारत आणि पोलंडमधील संबंध सुधारत आहेत. भारत आणि पोलंड यांच्या संबंधात आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. आज 45 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानाने पोलंड दौरा केला आहे. युक्रेनच्या संकटादरम्यान पोलंडच्या सहकार्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, 2022 साली युक्रेनच्या संकटादरम्यान तेथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या मोहिमेत पोलंडने दाखवलेले औदार्य भारत कधीही विसरू शकत नाही. 

समस्येचे निराकरण युद्धभूमी नाही
जगातील अनेक भागात सुरू असलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोणत्याही संकटात निष्पाप लोकांचे प्राण गमावणे हे संपूर्ण मानवतेसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्यासाठी आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीचे समर्थन करतो. यासाठी भारत आपल्या मित्र देशांसोबत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. युक्रेन आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले युद्ध आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. कोणतीही समस्या युद्धभूमीवर सोडवली जाऊ शकत नाही, यावर भारताचा ठाम विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

 

Web Title: PM Modi Security in Ukraine How will the Prime Minister's security be in the war zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.