रियाध : सौदी अरेबियातील रियाधमध्ये 'दावोस इन द डेजर्ट' संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असून त्यांनी गुंतवणूक विषयी आपले विचार मांडले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था येत्या पाच वर्षात 5 ट्रिलियन करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे सांगितले. तसेच, भारतातील वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आवश्यक असून ऊर्जेचा वापर आणि ऊर्जेची बचत दोन्ही महत्त्वाचे असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे...
- सौदी अरेबियामध्ये आल्यावर खूप ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते- भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे.- भारत आणि सौदी अरेबियातील संबंध शतकांपासून सुरू आहेत.- भारत आज जगातील तिसरा मोठा startups ecosystem बनला आहे. - आमचे अनेक startups जागतिक स्तरावर गुंतवणूक करत आहेत.- भारतात संशोधन आणि निर्मितीपासून तंत्रज्ञान उद्योजकतेचा एका इको-सिस्टिम तयार होत आह.- भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.- भारतात गेल्या पाच वर्षांत आम्ही अनेक महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. - गेल्या पाच वर्षात 286 बिलियन डॉलर एफडीए झाला आहे.- वन नेशन वन पॉवर ग्रीड, गॅस ग्रीड, ऑप्टिकल फायबर नेटवर्कसाठी भारत प्रयत्नशील आहे.-आम्ही 'इज ऑफ डुईंग बिझनेस'मध्ये नव्हे तर 'इस ऑफ लिव्हिंग'मध्येही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत.-आज भारतात प्रत्येक नागरिकाजवळ युनिक आयडी, मोबाईल फोन आणि बँक अकाऊंट आहे - भारतातील विकासाची गती आणखी वाढेल. - विकासाशी संलग्न असलेला प्रत्येक निर्णय आम्ही घेत आहोत.- वसुधैव कुटुंबकम संकल्पनेवर आमचा विश्वास आहे.- सक्षम भारताने कधी कुणावरही बळाचा वापर केला नाही. -भारताने आपल्याकडील साधने वाटण्याचे काम केले आहे.