PM Narendra Modi In Brazil : नायजेरियाचा पहिला दौरा संपवून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि.१८) ब्राझीलला पोहोचले आहेत. नरेंद्र मोदीब्राझीलमधीलजी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, नरेंद मोदी आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला ब्राझीलमध्ये आयोजित १९ व्या जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्राझीलमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. ब्राझीलमधील भारतीय समुदायाचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी हॉटेलबाहेर जमले होते. तसेच, ब्राझीलला पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले की, "मी जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो येथे पोहोचलो आहे. या शिखर परिषदेत विविध जागतिक नेत्यांसोबत चर्चा महत्त्वाची ठरेल, अशी मला आशा आहे."
नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांना भेटणार!पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये १९ व्या जी-२० शिखर परिषदेत ट्रोइकाचे सदस्य म्हणून सहभागी होतील. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसह भारत जी-२० ट्रोइकाचा भाग आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेत सक्रियपणे योगदान देत आहे. या शिखर परिषदेत नरेंद्र मोदी जागतिक महत्त्वाच्या विविध मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडतील. याशिवाय, जी-२० शिखर परिषदेदरम्यान नरेंद्र मोदी हे अनेक जागतिक नेत्यांना भेटणार आहेत.
'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर'ने पंतप्रधान मोदी सन्मानितअबुजा : नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर'ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने गौरव होणारे नरेंद्र मोदी हे दुसरे परदेशी व्यक्ती आहेत. गेल्या १७ वर्षांत भारतीय पंतप्रधान प्रथमच नायजेरियाला गेले होते. दरम्यान, नायजेरियातील मराठी समुदायाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.