G20 Summit in Brazil : रिओ दि जानेरो : ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथील जी-२० शिखर परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सांस्कृतिक आणि पब्लिक टू पब्लिक रिलेशन मजबूत करण्यासह व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानातील सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली.
या बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट देखील केली. या पोस्टमध्ये, बैठकीचे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, "रिओ डी जनेरियो जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भेटून आनंद झाला. यावेळी आमची चर्चा संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात होती. तसेच, आम्ही संस्कृती, शिक्षण आणि इतर अशा क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबद्दल चर्चा केली".
नॉर्वे आणि पोर्तुगालच्या नेत्यांची बैठकयाचबरोबर, रिओ डी जनेरियोमध्ये जी-२० शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत सुद्धा द्विपक्षीय बैठक झाली. तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमध्ये जी-२० शिखर परिषदेवेळी इंडोनेशिया आणि पोर्तुगालच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेत नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांसोबत वाणिज्य आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रात संबंध मजबूत करण्यावर भर दिला.
परराष्ट्र मंत्रालयाने दिली 'ही' माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांटो यांना भारत-इंडोनेशिया व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचे आश्वासन दिले, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, "भारत-इंडोनेशिया: मैत्रीपूर्ण संबंधांची ७५ वर्षे साजरी करत आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-२० ब्राझील शिखर परिषदेच्या निमित्ताने इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांटो यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी राष्ट्रपती प्राबोवो यांचे अभिनंदन केले आणि भारत-इंडोनेशिया व्यापक धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले".