न्यूयॉर्कः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी न्यूयॉर्कमधील ब्लुमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी लोकशाही, लोकसंख्या, वाढती मागणी आणि निर्णय घेण्याची क्षमता या चार फॅक्टरमुळे भारत प्रगतीपथावर असल्याचे सांगत नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
वेल्थ क्रिएशन आणि बिझनेस कम्युनिटीचा सन्मान करणारे आमचे सरकार आहे. आम्ही कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. या निर्णय सर्व उद्योजक ऐतिहासिक असल्याचे सांगतात. गुंतवणूक वाढवण्यासाठी एका पाठोपाठ एक अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
याचबरोबर, आम्ही नवे सरकार स्थापन केल्यानंतर उद्योगांच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे 50 हून अधिक कायदे संपुष्टात आणले आहेत. ही तर फक्त सुरूवात आहे. आणखी खूप काळ बाकी आहे. भारताबरोबर उद्योगात भागीदारी करण्यासाठी जगभरातील उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी आहे, असेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे.... - आम्ही जेव्हा सत्ता हातात घेतली तेव्हा भाराताची अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन डॉलर होती, गेल्या पाच वर्षात 1ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे.- भारताने अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. - आज भारताची ग्रोथ स्टोरीचे 4 महत्वपूर्ण फॅक्टर आहेत. जे जगात एकत्र मिळणे कठीण आहे. - Democracy, Demography, Demand आणि Decisiveness असे चार फॅक्टर आहेत.- गेल्या 4-5 वर्षात भारतातील प्रत्येक नागरिकाकडे मोबाईल फोन आणि बँक खाते आहे. - इन्सॉल्वंसी आणि बँकरप्सीला दोन हात करण्यासाठी इन्सॉलवंसी आणि बँकरप्सी कोड आणला आहे. - टॅक्समध्ये सुधारणा आम्ही सतत करत आहोत. - भारतात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे, पर्यावरणासहित आम्ही अन्य क्षेत्रात प्रगती करत आहोत. - आम्ही 450 गीगावॉट रिन्युएबल उर्जेचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. आण्विक उर्जा आमच्यासाठी एक आव्हान आहे.- आर्थिक गुंतवणुकीसाठी आशियात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.