वॉश्गिंटन - मी सर्वात आधी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी केलेल्या स्वागतासाठी मनापासून धन्यवाद देतो. आज व्हाईट हाऊसमध्ये जबरदस्त स्वागत केले हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. त्या सन्मानासाठी मी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि जिल बायडन यांचे आभार मानतो. ३ दशकापूर्वी सर्वसामान्य नागरिक म्हणून US ला आलो होतो, तेव्हा व्हाईट हाऊस केवळ बाहेरून पाहता आले. यावेळी पहिल्यांदाच व्हाईट हाऊसचे दरवाजे इतक्या मोठ्या संख्येने भारतीय अमेरिकनसाठी उघडण्यात आले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान आज वॉश्गिंटन डीसीत होते. मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसला पोहचले. याठिकाणी मोदींचे भव्यदिव्य स्वागत झाले. तिथे मोदी आणि बायडन प्रशासन यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. पंतप्रधान मोदींचे बायडन दाम्पत्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी व्हाईट हाऊसमध्ये संगीत समारंभही आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मोदी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष बायडन आणि आमच्यात भारत-अमेरिका यांच्यातील संबंधावर चर्चा होणार आहे. मला विश्वास आहे आमची चर्चा सकारात्मक आणि फायदेशीर ठरेल. आम्हाला दोन्ही देशांच्या विविधतेवर गर्व आहे. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय या मूळ सिद्धातांवर आमचा विश्वास आहे. भारत आणि अमेरिका लोकशाहीवर विश्वास ठेवतात. दोन्ही देशाच्या संविधानाचा मूळ उद्देश एकच आहे. आता भारत आणि अमेरिका यांची मंत्री आणखी मजबूत झालीय. दोन्ही देश मिळून एकत्रित पुढे जातील. आमची मैत्री जगासाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
तर १५ वर्षांनी भारताच्या पंतप्रधानाचे राजकीय स्वागत करण्यात आले आहे. हा क्षण दुर्लभ आहे. आता अमेरिका-भारत जगातील आव्हानांचा एकत्रित सामना करेल. गरिबी हटवणे आणि जलवायू परिवर्तन यासाठी भारताने नेतृत्व करावे. भारत आणि अमेरिका यांचा आदर्श एक आहे. समानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आमचा हेतू आहे. भारत आणि अमेरिका जगातील २ महान शक्ती आहे. आम्ही महान राष्ट्र आणि चांगले मित्र आहोत अशी भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केली.