सनीवेल - अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सनीवेल येथील पीएनजी ज्वेलर्सवर २० हून दरोडेखोरांनी बुधवारी दुपारी सिनेस्टाइल दरोडा घालत दागिने लुटून नेले. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मराठमोळ्या सराफांच्या अमेरिकेतील पेढीवर पडलेल्या या दरोड्याने खळबळ माजली आहे.
पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा टाकल्यावर दरोडेखोरांनी काचेची कपाटे हातोड्याने फोडून त्यातील दागिने घेऊन पळ काढला. पोलिसांनी तपास करत दरोडेखोरांच्या कारचा मागोवा काढला. त्यांचा पाठलाग सुरू असताना, दरोडेखोरांनी दागिने रस्त्यावर फेकले.
दीड महिन्यात तीन भारतीय दुकानांवर दरोडेकॅलिफोर्नियाच्या सनीवेल येथील पीएनजी ज्वेलर्सच्या शोरूमवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला होता. अमेरिकेतील भारतीय दागिन्यांच्या दुकानांवर गेल्या दीड महिन्यात तीन दरोडे पडले आहेत. सनीवेल येथील नितीन ज्वेलर्सवर ४ मे रोजी, तर नेवार्क येथील भिंडी ज्वेलर्सवर २९ मे रोजी दरोडा घालण्यात आला. त्यानंतर बुधवारी पीएनजी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाली. अशा दुकानांत शिरून तेथील काचेची कपाटे हातोड्याने फोडायची व त्यातील दागिने चोरायचे, अशी समान पद्धत या तीनही गुन्ह्यांत दिसून आली.
नेमक्या किती दागिन्यांची चोरी?- पीएनजी ज्वेलर्सच्या सनीवेल येथील दुकानावर पडलेल्या दरोड्याचा वेगाने तपास करून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.- टोंगा लाटू, तावके एसाफे, ओफा अहोमाना, किलिफी लीएटोआ आणि अफुहिया लावकेयाहो अशी या आरोपींची नावे आहेत. पीएनजी ज्वेलर्सच्या दुकानातून चोरलेल्या दागिन्यांपैकी काही ऐवज या पाच जणांकडून जप्त करण्यात आला आहे.- ३ तसेच अन्य दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. त्यांनी किती रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली, याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.