इस्लामाबाद : पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे खा. चौधरी अन्वारूल हक यांना पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान बनवण्यात आले आहे. याआधी माजी पंतप्रधान सरदार तन्वीर इलियास खान यांना उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायव्यवस्थेची बदनामी केल्याप्रकरणी विधानसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात हे पद रिक्त झाले होते.
नवीन पंतप्रधान चौधरी अन्वारूल हक यांनी सर्व प्रमुख पक्षांसह सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व ४८ सदस्यांचा विश्वास संपादन केला. ते इम्रान खान यांचे मित्र म्हणून ओळखले जातात. पाकच्या ताब्यात असलेला हा भाग ‘आझाद काश्मीर’ म्हणून ओळखला जातो. न्यायव्यवस्थेवर टीका करून अवमान केल्याबद्दल सरदार तन्वीर यांना ११ एप्रिल रोजी पदावरून अपात्र ठरवण्यात आले होते.
पाकचे बिलावल भुत्तो झरदारी भारतात येणारपाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी हे मे महिन्यामध्ये भारतात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने ही माहिती दिली आहे.