इस्लामाबाद -पीओकेतील मुझफ्फराबादमधील नागरिकांनी (Muzaffarabad) बुधवारी चिनी कंपनीविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शन केले. येथील नीलम-झेलम नदीवर चिनी कंपनी मेगा-डॅम तयार करत आहे. निदर्शनादरम्यान स्थानिक लोक 'दरिया बचाओ, मुजफ्फराबाद बचाओ' 'नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो' सारख्या घोषणा देत होते.
पीओकेचे पॉलिटिकल एक्टिविस्ट डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की पीओकेमध्ये अशा प्रकारची निदर्शने बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र कुणीही यांचे ऐकायला तयार नाही. चीनची थ्री गॉरजेस कॉर्पोरेशन येथे अब्जावधी डॉलर्सचा प्रोजेक्ट तयार करत आहे. त्यांनी नद्यांचा मार्गही बदलला आहे. यामुळेच येथे निदर्शने सुरू आहेत.
नुकताच, पाकिस्तान आणि चीनने पीओकेमध्ये आझाद पट्टन आणि कोहला हायड्रो पावर प्रोजेक्ट्स तयार करण्यासाठी करार केला होता. चीन-पाकिस्तान इकोनॉमीक क्वारिडोरअंतर्गत आझाद पट्टन हायड्रो पावर प्रोजेक्टसंदर्भात 6 जुलैला स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यापासून 700.7 मेगावॅट वीज निर्मिती होईल. 1.54 अब्ज डॉलर्सचा हा प्रकल्प चीनच्या जियोझाबा ग्रुपच्या कंपनीकडे आहे.
कोहला हायड्रोइलेक्ट्रिक पावर प्रोजेक्ट झेलम नदीवर तयार करण्यात येणार आहे. हा प्रोजेक्ट पीओकेच्या सुधनोटी जिल्ह्यातील आझाद पट्टन ब्रिजपासून जवळपास 7 किलोमीटर तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून 90 किमी अंतरावर आहे. हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच हा प्रकल्प चिनी कंपनी थ्री गॉरजेस कॉर्पोरेशन, इंटरनॅशनल फायनांस कॉर्पोरेशन आणि सिल्क बँकेच्या फंडातून तयार होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा
Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर
कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा