इस्लामाबाद: सोशल मीडियावर पाकिस्तानमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील एक पोलिस कर्मचारी भर रस्त्यात आपल्या मुलांना विकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी ओरडून सांगत आहे की, या मुलाची किंमत 50 हजार(पाकिस्तानी) रुपये आहे, माझ्या मुलांना विकत घ्या. त्या पोलिसाचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित लोकही त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत आहेत.
स्वतःची मुले विकायला काढली
वाइस वर्ल्ड न्यूजनुसार, पोलिस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्याचा आहे. स्वत:च्या मुलांना विकणाऱ्या पोलिसाचे नाव निसार लाशारी असे आहे. निसार लाशारी हा घोटकी कारागृहात तैनात होता. या कृत्याबाबत सांगताना लाशारी म्हणाला की, माझा मुलगा आजारी आहे, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी मला रजा हवी होती. पण, वरिष्ठांनी रजा देण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. रजेसाठी वरिष्ठांनी लाचेची मागणी केली. माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणूनच मी मुलांना विकण्याचा निर्णय घेतला.
लाच न दिल्याने झाली बदली निसार लाशारीने पुढे सांगितले की, मी लाच देऊ शकलो नाही, त्यामुळे माझी बदली घोटकीपासून 120 किमी अंतरावर असलेल्या लारकाना येथे केली आहे. मी खूप अस्वस्थ होतो म्हणून हे कृत्य केले. माझा गुन्हा काय ? मला ही शिक्षा का दिली जात आहे? मी गरीब आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच देऊ शकलो नाही. आता मला समजत नाहीये की मी लारकानाला नोकरी करायला जावं की मुलाच्या ऑपरेशनसाठी, इथे थांबावं