शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

नेपाळच्या पंतप्रधानांचे राजकीय भवितव्य आज ठरणार? स्थायी समितीची होणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 4:24 AM

क्षाच्या ४५ सदस्यांच्या महत्त्वाच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पक्षातील तणाव खूपच वाढल्यामुळे ओली आणि प्रचंड यांना मतभेद मिटविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही बैठक चौथ्यांदा लांबणीवर टाकली गेली होती.

काठमांडू : नेपाळच्या सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील (एनसीपी) मतभेद आठवड्यात अर्धा डझन बैठका घेतल्यानंतरही मिटलेले नाहीत. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहाल ‘प्रचंड’ यांच्यातील मतभेद सहा बैठकांनंतरही दूर झालेले नाहीत, असे गुरुवारी प्रसारमाध्यमांनी म्हटले.पक्षाच्या ४५ सदस्यांच्या महत्त्वाच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पक्षातील तणाव खूपच वाढल्यामुळे ओली आणि प्रचंड यांना मतभेद मिटविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही बैठक  चौथ्यांदा लांबणीवर टाकली गेली होती. चीनचे नेपाळमधील राजदूत हौवू यांकी यांनी ओली यांचे पद वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे आता ओली यांचे राजकीय भवितव्य स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत ठरेल.प्रचंड यांच्या गटाला वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाल आणि झालानाथ खनाल यांचा  पाठिंबा आहे. प्रचंड यांनी ओली यांनी नुकतीच भारतविरोधात केलेली वक्तव्ये ही ना राजकीदृष्ट्या योग्य होती ना राजनैतिकदृष्ट्या उचित, असे म्हणून त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे, अशी मागणी केलेली आहे.दोन गटांतील मतभेद वाढलेनेपाळ कम्युनिस्ट पक्षात ओली आणि प्रचंड यांच्या गटात सत्ता वाटपावरून मतभेद आहेत. ओली यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतर्फीच समाप्त केले होते, तसेच कोविड-१९ महामारीचा प्रश्न सरकारने ढिसाळ पद्धतीने हाताळल्याबद्दल व पक्षाला वळसा घालून त्यांनी निर्णय घेण्यावरून ओली-प्रचंड गटांतील मतभेद आणखी तीव्र झाले आहेत.ओली आणि प्रचंड यांनी हे मतभेद दूर करण्यासाठी बैठका घेतल्या; परंतु दोन्ही गटांनी दोन-दोन हात करायचेच, असे ठरवल्याचे दिसते, असे ‘द काठमांडू पोस्ट’ने वृत्त दिले.ओली यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी देशात कुठे-कुठे निदर्शने झाली. रस्त्यांवर कोणालाही निदर्शने करण्यास सांगणार नाही, असा करार प्रचंड यांच्याशी ओली यांचा झालेला आहे, हे विशेष.

टॅग्स :NepalनेपाळPoliticsराजकारणInternationalआंतरराष्ट्रीय