गेल्या काही काळापासून आजारपणाशी झुंजत असलेले ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी आज व्हॅटिकस सिटी येथे अखेरचा श्वास घेतला. व्हॉटिकनमधील प्रशासनाने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा करताना व्हॅटिकनने सांगितले की, रोमन कॅथॉलिक चर्चे पहिले दक्षिण अमेरिकन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसामध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. तसेच ते बऱ्याच दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. हल्लीच त्यांना रुग्णालयामधून सुट्टी देण्यात आली होती.