लंडन : अत्यंत लोकप्रिय ब्रिटिश पॉपस्टार व गायक जॉर्ज मायकेल (५३) यांचे येथे राहत्या घरी रविवारी निधन झाले. ‘इफ यु वेअर देअर’, ‘आय एम युवर मॅन’ आणि ‘एव्हरीथिंग शी वाँट्स’ या अत्यंत लोकप्रिय गीतांनी मायकेलनी १९८० मध्ये चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले होते. मायकेल यांचे हृदय निकामी ठरल्यामुळे अंथरुणात निधन झाले अशी माहिती त्यांचे व्यवस्थापक मायकेल लिप्पमन यांनी दिल्याचे वृत्त ‘गार्डियन’ने दिले. मायकेलच्या कुटुंबियांना या अत्यंत दु:खदवेळी खासगीपणा जपायचा आहे, असे सांगून लिप्पमन यांनी आणखी काही भाष्य केले नाही. जॉर्ज मायकेल यांनी स्वत: काही गाण्यांचीही रचना केली होती आणि त्या लोकप्रिय ठरल्या होत्या. जॉर्ज मालकेल यांनी अगदी यावर्षीही काही कार्यक्रम केले होते आणि त्यांना पूर्वीइतकीच गर्दी होत होती.थॉमस व्हॅलीच्या पोलिसांनी सांगितले की जॉर्ज मायकेल यांचा मृत्यू कारण स्पष्ट नसलेला असला तरी संशयास्पद नाही. शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय आम्ही काहीही भाष्य करणार नाही. जॉर्ज मायकेलची लोकप्रियता ‘व्हॅम’ या गटाने झाली. हा गट ‘क्लब ट्रोपिकाना’ व ‘लास्ट ख्रिसमस’साठी प्रसिद्ध होता. त्याने त्याच्या सहकाऱ्यासह जशी लोकप्रियता मिळवली तशीच ती ‘करिअर व्हिस्पर’, ‘फेथ’, ‘आऊटसाईड’ आणि ‘फ्रीडम ९०’ या एकट्याने गायलेल्या गीतांनीही तो लोकप्रिय झाला. त्याच्या आल्बम्सची विक्री काही कोटींमध्ये झाली होती. (वृत्तसंस्था)बॉलिवूडची श्रद्धांजलीलोकप्रिय व ग्रॅमी अवार्ड विजेता गायक जॉर्ज मायकेल यांच्या आकस्मात निधनाबद्दल बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते करण जोहर, संगीतकार ए. आर. रहमान, अभिनेते अभिषेक बच्चन, अर्जुन रामपाल, विशाल ददलानी, दिया मिर्झा व इतरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. बॉलिवूडमधील या कलाकारांनी टिष्ट्वटरवर मायकेलने जगातील संगीत क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे आभार मानले आहेत.
पॉपस्टार जॉर्ज मायकेल कालवश
By admin | Published: December 27, 2016 12:49 AM