लॉस एंजेलिस - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात जवळपास 2,19,033 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा 8 हजारावर गेला आहे. या आजारापासून बचावासाठी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण पॉर्न स्टार्सना मात्र याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या एका वृत्तानुसार, जगभरातील लोकांचे आयसोलेशनमध्ये राहणे अथवा अनेकांना क्वारेंटाईन करणे, यामुळे पॉर्न स्टार्सना मोठा फायदा होत आहे. त्यांचा व्यवसाय तेजी आहे.
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरातील पॉर्न स्टार केट केनेडीने सांगते, की वेबकॅम बिझनससाठी ही चांगली वेळ आहे. कोट्यवधी ग्राहक घरातच आहेत आणि त्यांच्याकडे काही कामही नाही.
'व्हॅक्सीन तयार करणाऱ्यासोबत रात्र घालवायला तयार -केटने म्हटले आहे, की वेब कॅमवर पाहण्यासाठी ती एक महिन्याचे 10 डॉलर घेते. मात्र आता काम फार वाढले आहे. यामुळे त्यांची आठवड्याची कमाई 1050 डॉलरहून 1700 डॉलरवर गेली आहे. मात्र काहीजण असेही आहेत, की ज्यांची कमाई फार कमी झाली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे त्यांच्याकडे ग्राहक येणे कमी झाले आहे. या जागतीक संकटामुळे अनेक पॉर्न स्टार्स बेरोजगारही झाले आहेत.
रशीयामध्ये अशीच एक पॉर्न स्टार आहे, जीचे नाव आहे ल्यूबोव बुशूयेवा. जो कुणी कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन (लस) तयार करेल त्याच्यासोबत आपण रात्र घालवायला तयार आहोत, अशी ऑफर बुशूयेवाने दिली आहे. मात्र तीने हे वक्तव्य भावनिकतेने दिले, की गांभीर्याने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एवढेच नाही, तर कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे तीला घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे.
पॉर्न हबची प्रिमियम सेवा मोफत -यापूर्वी प्रसिद्ध पॉर्न वेबसाइट पॉर्न हबने इटलीमध्ये 3 एप्रिलपर्यंत आपली प्रिमियम सेवा मोफत केली आहे. लॉक डाउनदरम्यान संपूर्ण महिनाभर ही प्रिमियम सेवा मोफत राहील. एवढेच नाही तर या साइटने आपल्या कमाईचा एक भाग कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचीही घोषणा केली आहे. ही जगातील सर्वात मोठी पॉर्न वेगबासाईट आहे. या साइटला रोज 11 कोटी 50 लाख लोक भेट देतात.
जगात सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीत इटलीचा 7वा क्रमांक लागतो. तर अमेरिका, जापान आणि इंग्लंड प्रत्येकी एक, दोन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.