चीनमध्ये पसरलेल्या कोरोनाने आतापर्यंत 213 देशांमध्ये कहर माजविण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 2 कोटी 20 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 8 लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना लस पुढील दोन महिन्यांत येणार आहेत. लस विकसित करणाऱ्यांसाठी एक चांगली बाब म्हणजे कोरोना रुप बदलत नाहीय.
यामुळे काही तज्ज्ञ हिवाळ्यापर्यंत कोरोनाची लस येण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तर काही तज्ज्ञ कोरोना पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त खतरनाक पद्धतीने पसरणार असल्याचे सांगत आहेत. थंडीमध्ये येणारी कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षाही जास्त खतरनाक असू शकते, असे या तज्ज्ञांचे मत आहे.
WHO सोबत काम केलेल्या इंफेक्शियस डिसीज एक्सपर्ट क्लाउज स्टोहर यांचा एक लेख 'द प्रिंट'मध्ये छापून आला आहे. या अहवालानुसार कोरोना व्हायरसचे एपिडेमायोलॉजिकल बिहेविअर कोणत्याही अन्य रेस्पिरेटरी डिसीजपासून वेगळे नसते. यामुळे आता सुस्त झालेला व्हायरस थंडीत पुन्हा सक्रीय होऊ शकतो. जगाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून लढण्यासाठी तयार रहायला हवे. कोरोनाची संभाव्य लाट सध्याच्या लाटेपेक्षाही जास्त धोक्याची असू शकते. ब्रिटेनच्या अकादमी ऑण मेडिकल सायन्सचे देखील असेच मत आहे. येथील तज्ज्ञांनुसार 2021 च्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये 2020 च्या सुरुवातीला जे हाल होते तसेच असणार आहेत.
ब्रिटेनचे मुख्य मेडिकल ऑफिसर क्रिस व्हिट्टी यांनी सांगितले की, कोरोना लसीच्या भरवशावर राहणे चुकीचे आहे. न्यू स्कायला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्याला पुढील हिवाळ्यापर्यंत लसीशिवाय लढण्य़ासाठी तयार रहायला हवे. हिवाळ्यात लस मिळेल असा विचार करणे मुर्खपणाचे होईल. कदाचित माझे म्हणणे चुकीचेही ठरेल. कारण जगभरात कोरोना लसीवर काम सुरु आहे. लवकरात लवकर कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, ही लस सुरक्षित आहे का याचेही संशोधन होणे गरजेचे आहे. या प्रक्रियेला वेळ लागतो. यामुळे हिवाळ्यात आपल्याला लस मिळणार नाहीय या तयारीनेच कोरोनासोबत लढायला हवे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा
तुमचा पगार किती? 30,000; मोठी योजना घेऊन येतेय मोदी सरकार
CoronaVirus: कोरोना लस: भारत आज मोठे पाऊल टाकणार; पुण्यावरच सारी मदार
Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?
IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत