Biggest Lottery News : अमेरिकेत इतिहासातील सर्वात मोठी लॉटरीची रक्कम आणि त्याच्या विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे. या व्यक्तीने तब्बल 16,500 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. पण त्याला सूमारे 8000 कोटी रुपये मिळणार आहेत. याचे कारण म्हणजे, त्याने संपूर्ण रक्कम एकरकमी घेण्याचा पर्याय निवडला आहे. हप्त्यांचा पर्याय निवडला असता, तर त्याला हळु-हळू 16,500 कोटी रुपये मिळाले असते.
ही घटना अमेरिकेचे आहे. कॅलिफोर्निया लॉटरी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एडविन कॅस्ट्रो नावाच्या व्यक्तीने पॉवरबॉल जॅकपॉट जिंकला आणि त्यात त्याला $ 997.6 मिलियन (सुमारे 8,277 कोटी रुपये) एकरकमी पेमेंट मिळाले आहे. पत्रकार परिषदेत फक्त रक्कम आणि विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय अन्य कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, कॅस्ट्रोने नोव्हेंबरच्या सुरुवातीला कॅलिफोर्नियातील अल्ताडेना येथून तिकीट खरेदी केले होते. त्याचे सर्व सहा क्रमांक ड्रॉमध्ये काढलेल्या संख्येशी जुळले. कॅलिफोर्निया कायद्यानुसार, लॉटरी विजेत्याचे नाव आणि इतर माहिती काही अटींनुसार उघड केली जाऊ शकते. यामध्ये विजेत्याचे पूर्ण नाव, तिकीट विक्रेत्याचे नाव, स्थान, जॅकपॉट जिंकल्याची माहिती आणि रक्कम यांचा समावेश आहे.
विजेत्याकडे ड्रॉच्या तारखेपासून एक वर्षाचा कालावधी आहे, ज्यात तो बक्षिसाचा दावा करू शकतो. मात्र, 16,500 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या कॅस्ट्रो यांनी आपल्या विजयाची बातमी मिळताच सार्वजनिक मंचावर येण्यास नकार दिला. ही लॉटरी जिंकल्याबद्दल कस्ट्रोने आश्चर्य आणि आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे, यापूर्वी, अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी लॉटरी नोव्हेंबर 2022 मध्ये निघाली होती. त्या लॉटरीची रक्कम 1.6 अब्ज यूएस डॉलर होती. त्याचे नाव कधीच उघड केले नाही.