ऑनलाइन लोकमत
लंदन, दि. 25 - दक्षिण अमेरिकेतील चिली या देशाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी होती. या भूकंपात जीवितहानीचे वृत्त नसले तरी भूकंप कॆंद्रापासून एक हजार किमी परिसरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण चिलीमधील पोर्टोमाँट येथे जमिनीपासून 15 किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. अमेरिकेच्या भूगर्भतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 225 किमी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.