पोप यांच्या विशेष विमानातून : पोप फ्रान्सिस यांनी सोमवारी प्रथमच आपल्या मृत्यूसंदर्भात जाहीर भाकीत करत आपण दोन ते तीन वर्षच जगण्याची शक्यता असल्याचे सांगितले. मृत्यूपूर्वी पोपपदावरून निवृत्त होण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली नाही.
दक्षिण कोरियाहून व्हॅटीकनला परतत असताना विमानात ते पत्रकारांशी बोलत होते. दक्षिण कोरियाच्या वास्तव्यादरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या जागतिक लोकप्रियतेची झलक पाहावयास मिळाली होती. याविषयी छेडले असता पोप म्हणाले की, ईश्वराच्या लेकांचे दातृत्व म्हणून आपण याकडे पाहतो. यामुळे गर्व होऊ नये म्हणून मी माङया चुका आणि अपराधांचा विचार करतो. कारण, हे क्षणिक असल्याची मला जणीव आहे.
दोन ते तीन वर्षानंतर मी फादर्स हाऊसमध्ये नसेन. सुरूवातीला मला भिती वाटली होती. मात्र, अलीकडे मी ही लोकप्रियता अधिक नैसर्गिकपणो हाताळतो, असे ते म्हणाले. पोप यांनी यापूर्वी ते त्यांच्या निर्मात्याला कधी भेटणार याची जाहीर वाच्यता केली नव्हती. मात्र, व्हॅटिकनमधील एका सूत्रने पोप यांनी त्यांच्या निकटवर्तीयांनी आपणाकडे
फार काळ उरलेला नसल्याचे
यापूर्वीच सांगितले असल्याचे स्पष्ट केले.
6क् वर्षापूर्वी कॅथॉलिक बिशप निवृत्त होतात हे ऐकिवात नव्हते. मात्र, अलीकडे ही बाब सामान्य झाली आहे. पोप बेनेडिक्ट 16 वे यांनी गेल्यावर्षी निवृत्ती पत्करून हा मार्ग खुला केला. आपणास मज्जासंस्थेच्या काही समस्या असून त्यावर उपचारांची आवश्यकता आहे, असेही पोप फ्रान्सिस यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
4आपण पोपपदाची जबाबदारी पूरेशा प्रमाणात पार पाडू शकत नसल्याचे जाणवल्यास आपले पूर्वाधिकारी पोप बेनेडिक्ट 16 वे यांच्याप्रमाणोच पोप पदावरून निवृत्त होऊ शकतो, असे पोप फ्रान्सिस यांनी नमूद केले.