वाढत्या ताणतणावाचा परिणाम होत असल्यानं अनेक महिलांना गर्भधारणेत अडथळे येत आहेत. वैद्यकीय उपचार घेऊनही गर्भधारणेत समस्या उद्भवत असल्यानं अनेक महिला त्रासल्या आहेत. मात्र ब्रिटनमधल्या एका महिलेची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. ३९ वर्षांच्या केट हर्मन यांना ५ मुलं आहेत. गर्भधारणा टाळण्यासाठी त्यांनी विविध पर्यायांचा वापर केला. मात्र तरीही त्यांना गर्भधारणा टाळता आली नाही. या समस्येमुळे केट पुरत्या हैराण झाल्या आहेत.
केट यांची गर्भधारणा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. बर्थ कंट्रोल पिल घेऊनही केट दोनदा गरोदर राहिल्या. पतीची नसबंदी केल्यानंतरही त्या एकदा गर्भार राहिल्या. गर्भनिरोधक गोळ्यांच्या बाबतीत मी कमनशिबी असल्याची व्यथा त्यांनी मांडली. केट आणि त्यांचे पती डेन यांना ५ मुलं आहेत. त्यांचं वय २ वर्षांपासून २० वर्षांपर्यंत आहे.जुन्या मालकाला संपवलं, आता तुमची पाळी! नव्या घरात सापडली बाहुली अन् थरकाप उडवणारी चिठ्ठी
माझा सगळ्यात मोठा मुलगा २० वर्षांचा आहे. त्यावेळी मी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या होत्या. मात्र तरीही मी गरोदर राहिले. दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा आई झाले तेव्हा मी पिल्स घेतल्या होत्या. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी माझ्या पतीनं नसबंदी करण्याचा निर्णय घेतला, असं केट यांनी सांगितलं. गर्भधारणा रोखण्यात नसबंदी ९९.९ टक्के प्रभावी ठरते.
डेननं नसबंदी केल्यानंतर मी निश्चिंत झाले. आम्ही कंडोमशिवाय शरीर संबंध ठेवण्यास सुरुवात केली. चार वर्षे सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. त्यानंतर अचानक माझ्या मासिक पाळीला उशीर झाला. असं कधीच होत नसल्यानं मी गर्भाधारणा चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे मला धक्काच बसला. मी पुन्हा चाचणी केली. पण रिझल्ट तोच होता. डेनचा स्पर्म काऊंटदेखील सामान्य होता, असं केट यांनी सांगितलं. आता आम्ही भविष्याची चिंता करणं सोडून दिलंय. जे व्हायचं ते होणारच असा विचार करून आम्ही फार टेन्शन घेत नाही, असं केट म्हणाल्या.