यांगून - एका व्यक्तीने यांगून सरोवरालगत म्यान्माच्या नेत्या आँग सांग सू की यांच्या निवासस्थानाच्या आवारात पेट्रोल बॉम्ब डागल्याने खळबळ उडाली आहे. लोकशाहीच्या कट्टर पुरस्कर्त्या म्हणून ओळखल्या जाणा-या आँग सांग सू की यांना देशांतर्गत जोरदार पाठिंबा आहे; परंतु रोहिंग्याबाबत मौन बाळगल्यामुळे त्यांना जगभरातील संतापाला सामोरे जावे लागत आहे.सरकारचे प्रवक्ते हतै यांनी या हल्ल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. हल्लेखोरांचा हेतू काय होता, याबाबत काहीही तर्क व्यक्त न करता त्यांनी फेसबुकवर संशयिताचे छायाचित्र जारी केले आहे.गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि लुंगी असा त्याचा पेहराव आहे. रोहिंग्या मुस्लिम समुदायाच्या बाजूने भूमिका न घेतल्याने आंतरराष्टÑीय स्तरावर सू की यांची प्रतिमा खालावली आहे. या हल्ल्याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. ही घटना घडली तेव्हा त्या नेपिदा येथे होत्या. (वृत्तसंस्था)किरकोळ नुकसानपेट्रोल बॉम्ब हल्ल्याने किरकोळ नुकसान झाले आहे, असे नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पार्टीचे की टो यांनी फेसबुकवरील पोस्टवर म्हटले आहे.काहीही नुकसान झाले नाही, की जळाले नाही. हल्लेखोराला अटक करण्यासाठी सुरक्षा दले प्रयत्न करीत आहेत.
सू की यांच्या बंगल्याच्या आवारात पेट्रोल बॉम्ब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 3:50 AM