शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
2
डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
3
"पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, मांजर बनतील; जे लोकशाही..."
4
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
5
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
6
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
7
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
8
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
9
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
10
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
12
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
13
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
14
ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?
15
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
16
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
17
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
18
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
19
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
20
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप

युक्रेनच्या फाळणीची तयारी...! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष दुतानं तयार केला प्लॅन; ठेवला धक्कादायक प्रस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 11:36 IST

यासंदर्भात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ यांनी युक्रेनचे काही महत्वाचे प्रदेश रशियाला देण्यासंदर्भात भाष्य केले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आणि शांततेचा मार्ग काढण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून यात अमेरिकेचे ट्रम्प सरकार विशेष रस घेताना दिसत आहे. या संदर्भात अमेरिका दोन्ही देशांसोबत बोलत असून शांततेचा मार्ग काढण्यासाठी फॉर्म्युला तयार करताना दिसत आहे. यातच आता, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक धक्कादायक प्रस्तान ठेवल्याचे वृत्त आहे.

यासंदर्भात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ यांनी युक्रेनचे काही महत्वाचे प्रदेश रशियाला देण्यासंदर्भात भाष्य केले आहे. त्यांनी युक्रेनचे चार प्रदेश रशियाला देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र त्यांच्या या प्रस्तावावरून ट्रम्प प्रशासनातच अंतर्गत मतभेद बघायला मिळत आहेत.  

खरे तर, गेल्या आठवड्यातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी एका व्यक्तीला वॉशिंग्टन येथे पाठवले होते. त्यांनी ट्रम्प प्रशासनासोबत रात्रीचे जेवण घेतले आणि युक्रेन-रशिया शांततेवर चर्चा केली. यानंतर ४८ तासांच्या आतच मॉस्कोसोबतच्या चर्चेचे नेतृत्व करणारे अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही चर्चा केल्याचे वृत्त आहे. 

"पूर्व युक्रेनचे चार प्रदेश रशियाला देण्यात यावेत" -"युक्रेनमध्ये युद्ध थांबवण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे, 2022 मध्ये अवैध पद्धतीने कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेले पूर्वी युक्रेनमधील चार प्रदेशांचा मालकी हक्क रशियाला देण्यात यावा, " असे विटकॉफ यांनी म्हटले आहे. याशिवाय, ट्रम्प यांचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ यांनी युद्ध थांबवण्यासाठीचा हा सर्वात जलद मार्ग असल्याचे सांगितले असल्याचे, अमेरिकेचे दोन अधिकारी आणि या सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन असलेल्या पाच जणांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटले आहे.

विटकॉफ यांनी यापूर्वीही यावर भाष्य केले आहे. नुकतेच एका पॉडकास्ट इंटरव्ह्यूमध्येही त्यांनी हे मत मांडले होते. मात्र, कीवने (युक्रेन) हा प्रस्तान आधीच फेटाळला आहे. तसेच अमेरिका आणि युरोपातील अधिकारीही, ही रशियाची अतिरेकी मागणी असल्यचे मानतात. दरम्यान, विटकॉफ शुक्रवारी पुतिन यांना भेटण्यासाठी रशिया दौऱ्यार गेले आहेत. त्यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिका