उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याला सत्तेतून घालविण्यासाठी अमेरिका, जपान आणइ दक्षिण कोरियाने मोहिम उघडली आहे. उनविरोधात सायबर युद्ध सुरु करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात उत्तर कोरियाच्या नागरिकांना भडकविण्याचे काम सुरु झाले आहे.
उत्तर कोरियाच्या सायबर हॅकर्सविरोधात एक मल्टीनॅशनल सायबर अॅक्शन प्लॅन सुरु करण्यात येणार आहे. उत्तर कोरिया सायबर हॅकर्सद्वारे लोकांना लुबाडण्याचे काम केले जाते. उत्तर कोरिया जगातील सर्वात मोठे सायबर फ्रॉड सेंटर चालविते. या पैशांचा वापर किम जोंग उनच्या कुटुंबियांसाठी केला जातो. सायबर फसवणूक करून तो पैसा उत्तर कोरियाच्या लष्करी क्षमतेला वाढविण्यासाठी केला जातो. उत्तर कोरियाची ही टीम मालवेअरचा वापर करत असते.
एफबीआयने अमेरिकेला ही माहिती दिल्यानंतर तिन्ही देशांच्या प्रतिनिधींची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीला कोरियन द्वीपकल्प धोरणाचे महासंचालक ली जून-इल, उत्तर कोरियासाठी अमेरिकेचे उप विशेष प्रतिनिधी सेठ बेली आणि सायबर धोरणाचे प्रभारी जपानचे राजदूत नाओकी कुमागाई हे उपस्थित होते.
अंदाजे 20 अमेरिकन, दक्षिण कोरियन आणि जपानी सरकारी विभाग, मंत्रालये आणि एजन्सींचे एजंटही या बैठकीला आले होते. क्रिप्टोकरन्सींची चोरी थांबवण्यासाठी, त्यांच्या माहिती तंत्रज्ञानाच्या नेटवर्कला जाम करण्यासाठी आणि उत्तर कोरियामधून उद्भवणारा सायबर धोका दूर करण्यासाठी रणनिती ठरविण्यात आली आहे. यामध्ये उनविरोधात गेली अनेक दशके अत्याचार सहन करणाऱ्या उत्तर कोरियाच्या जनतेला भडकविले जाणार आहे.
याद्वारे उत्तर कोरियाच्या लोकांना या गोष्टींची माहिती देणे, जगात घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती देणे आणि किम जोंग उन सरकारच्या विरोधात चिथविण्याचे काम केले जाणार आहे. राजवटीच्या विरोधात भडकविले तर हे लोक उठाव करू शकणार आहेत.