शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गोल्ड कार्ड' योजनेमुळे भारतीयांचे स्वप्न भंगणार; काय परिणाम होणार? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 21:37 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज गोल्ड कार्ड योजना जाहीर केली.

US Gold Card: अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे देशात अवैधरित्या राहणाऱ्यांना बाहेर काढण्याची मोहिम सुरू केली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी घोषणाही केली आहे. ट्रम्प यांनी नवीन 'गोल्ड कार्ड' योजना जाहीर केली, ज्याद्वारे अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे. पण, यासाठी मोठी किंमत मोजावे लागणार आहे. तुम्हाला अमेरिकत कायमचे वास्तव्य करायचे असेल, तर त्यासाठी 5 मिलियन डॉलर्स (43 कोटी रुपये) खर्च करावे लागतील.

गुंतवणूक आणि नोकऱ्या वाढवण्यावर भरअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी 'गोल्ड कार्ड' योजनेची घोषणा केली. ते म्हणाले की, $5 मिलियन शुल्क भरुन स्थलांतरितांना अमेरिकेत राहण्याची परवानगी मिळू शकते. ही योजना सध्याच्या 35 वर्षे जुन्या EB-5 व्हिसा कार्यक्रमाची जागा घेईल. पूर्वी अमेरिकन व्यवसायांमध्ये किमान एक मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अट होती. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची ही योजना अमलात आल्यास, अनेक वर्षांपासून ग्रीन कार्ड मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. 

नवीन योजना एप्रिलपासून सुरू होणारडोनाल्ड ट्रम्प यांची ही योजना एप्रिलपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला सुमारे 10 मिलियन गोल्ड कार्ड व्हिसा जारी केले जाऊ शकतात. या योजनेद्वारे श्रीमंत लोक आपल्या देशात येतील, भरपूर पैसा खर्च करतील, भरपूर कर भरतील आणि भरपूर लोकांना रोजगार देतील, असे ट्रम्प म्हणाले.

गोल्ड कार्ड व्हिसा आणि EB-5 मधील अंतरसध्याच्या EB-5 कार्यक्रमांतर्गत परदेशी गुंतवणूकदारांना अमेरिकन व्यवसायांमध्ये $800,000-1,050,000 ची गुंतवणूक करणे आणि किमान 10 नवीन रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी 1990 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर गेल्या अनेक वर्षांपासून गैरव्यवहार आणि फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. आता या नवीन गोल्ड कार्ड व्हिसा योजनेद्वारे $5 मिलियनची गुंतवणूक येईल. यूएस रेसिडेन्सी मिळवण्याचा हा एक जलद आणि सोपा मार्ग आहे. यामध्ये नोकऱ्या निर्माण करण्याची गरजही संपुष्टात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, EB-5 कार्यक्रमांतर्गत नागरिकत्व पाच ते सात वर्षांत उपलब्ध होते, तर प्रस्तावित गोल्ड कार्ड व्हिसा योजनेंतर्गत नागरिकत्व त्वरित उपलब्ध होईल.

भारतीयांवर काय परिणाम होईल?$5 मिलियन (43,56,14,500.00 भारतीय रुपये) ची किंमत म्हणजे फक्त भारतातील अतिश्रीमंत उद्योगपतींनाच अमेरिकेचे नागरिकत्व मिळणे परवडणारे आहे. यामुळे अनेक दशकांपासून ग्रीन कार्डची प्रतीक्षा करणाऱ्या कुशल व्यावसायिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, EB-5 अंतर्गत अर्जदार कर्ज घेऊ शकतात किंवा निधीचा लाभ घेऊ शकतात, तर गोल्ड कार्ड व्हिसासाठी संपूर्ण रोख पेमेंट आवश्यक आहे, ज्यामुळे ते भारतीयांच्या मोठ्या वर्गाच्या आवाक्याबाहेर आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत