काराकस - व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना लक्ष्य करून शनिवारी ड्रोण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात निकोलस माडुरो हे थोडक्यात बचावले. हा हल्ला करण्यात आला तेव्हा माडुरे हे राजधानी काराकस येथे आपल्या सैनिकांसमोर भाषण देत होते.
माडुरो यांचे भाषण सुरू असताना त्यांच्या पासून जवळच स्फोटके लादलेले काही ड्रोन पडले. यासंदर्भात अधिक माहिती देताना व्हेनेझुएलाचे माहिती मंत्री जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, हा हल्ला माडुरो यांना लक्ष्य करून करण्यात आला. पण माडुरो सुरक्षित आहेत. मात्र या हल्लात एकूण सात जण जखमी झाले आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5.41च्या सुमारास स्फोटाचा आवाज ऐकला. अधिक तपासामाध्ये ड्रोनला स्फोटके बांधून हल्ला करण्यात आल्याचे उघडकीस आले. पण तिथे उपस्थित असलेल्या फायटर्सनी हा हल्ला हाणून पाडला.
दरम्याना व्हेनेझुएलातील एनटीएन24 टीव्हीने या हल्ल्याशी निगडित एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो हे भाषण देत असताना तेथे उपस्थित असलेली राष्ट्रपतींची पत्नी आणि अन्य अधिकारी अचानक आकाशाकडे पाहताना दिसतात.