रशियात 2024 मध्ये निवडणुका होणार असून राष्ट्रपती व्लादिमीर पुतिननिवडणूक लढवणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच, आता पुतिन यांचा पुढचा प्लॅन काय असणार? यासंदर्भात खुद्द रशियाकडून भाष्य करण्यात आले आहे. यासंदर्भात, क्रेमलीनचे प्रवक्ता दमित्री पेस्कोव्ह यांना विचारले असता, पुतिन यांनी 2024 ची निवडणूक लढण्यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही, असे पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.
पुतिन यांचा चौथा कार्यकाळ - पुतिन सध्या राष्ट्राध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 2000 आणि 2008 मध्ये सलग दोन वेळा ते राष्ट्रपती म्हणून निवडून आले. ते 2012 मध्ये पुन्हा या पदावर आले. रशियाने आपल्या संविधानात अनेक वेळा बदलले आहे. येथे 1993 मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ कमी करून चार वर्षांवर आणला होता. हा कार्यकाळ पूर्वी पाच वर्षांचा होता. तेव्हा बोरिस येल्टिसन हे रशियाचे राष्ट्रपती होते.
त्यानंतर 2008 मध्ये रशियाच्या संविधानात पुन्हा बदल करण्यात आला आणि हा कार्यकाळ सहा वर्षांचा करण्यात आला. यानंतर 2012 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा सहा वर्षांचाच नियम होता. पण 2020 मध्ये, रशियात एक सार्वमत घेण्यात आले. जे अलीकडेच झालेल्या घटना दुरुस्तीवर आधारित होते. यात कार्यकाळ वाढवण्यासंदरभातील मुद्दाही समाविष्ट होता. याला मंजुरी मिळाली आणि राष्ट्रपती पुतिन यांचा 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला.
काय विचार करतात पुतीन? - यासंदर्भात पुतिन यांनी अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. ऑक्टोबर 2020 मध्ये वालदाई डिस्कशन क्लब दरम्यान त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ही सुधारणा लागू झालेली होती. यावर पुतीन यांनी, 'त्यांना हे माहीत आहे की, कधी ना कधी हे संपणार. 2024 मध्ये अथवा त्यानंतर काय होईल हे येणारा काळच ठरवेल,' असे म्हटले होते.