शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान जर्मनीत

By admin | Published: April 13, 2015 4:29 AM

‘मेक इन इंडिया’ योजना यशस्वी करण्याच्या उद्देशातहत तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचा दौरा आटोपून रविवारी

हॅनोव्हर : ‘मेक इन इंडिया’ योजना यशस्वी करण्याच्या उद्देशातहत तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचा दौरा आटोपून रविवारी हॅनोव्हर (जर्मनी) येथे दाखल झाले. येथे पोहोचताच त्यांनी जर्मनीतील प्रभावशाली उद्योगपतींची गोलमेज बैठकीत भेट घेऊन चर्चाही केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जर्मनीतील उद्योगपतींना भारतातील व्यावसायिक वातावरण सुलभ करण्याचा विश्वास दिला.भारतातील व्यावसायिक वातावरण विदेशी कंपन्यांसाठी अधिक सोयीचे करता येईल, याबाबतही त्यांनी जर्मनीतील उद्योगपतींची मते जाणून घेतली. तसेच या उपाय-योजना अंमलात आणण्यासाठी आपण व्यक्तीश: लक्ष देत असल्याची ग्वाहीही मोदी यांनी दिली.लांगेनहेगन विमानतळावरुन पंतप्रधान मोदी मुक्कामासाठी हॉटेलकडे रवाना झाले. त्या ठिकाणी आधीपासून अनेक भारतीय उपस्थित होते. त्यांनी मोदी ...मोदी अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनीही काही लोकांशी हस्तांदोलनही केले.तीन दिवसांच्या जर्मनीच्या भेटीत ते जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि जर्मनीतील उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. मोदी यांच्या भेटीआधीच जर्मनीतील रस्त्यांरस्त्यांवर ‘मेक इन इंडिया’चे फलक लागले होते. (वृत्तसंस्था)हॅनोव्हर प्रदर्शनात यंदा भारतही भागीदार असून या प्रदर्शनात ४०० भारतीय कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तसेच १०० ते १२० भारतीय सीईओ आणि ३ हजार जर्मन प्रतिनिधी सहभागी होत आहेत. (वृत्तसंस्था)