काठमांडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑगस्ट रोजी नेपाळच्या दौ:यावर जाणार असून नेपाळचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. या दौ:यात ते नेपाळी संसदेत भाषण करणार आहेत. तसेच पाचव्या शतकातील श्री पशुपतीनाथ मंदिराला भेट देऊन 4 ऑगस्टला ते पूजाही करणार आहेत. 1997 नंतर नेपाळला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. घटना सभेपुढेही त्यांचे भाषण होणार आहे, असे विदेशमंत्री महेंद्र पांडे यांनी सांगितले. दरम्यान, भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांचे संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी काठमांडूत आगमन झाले. 23 वर्षानंतर 26 जुलै रोजी भारत-नेपाळ संयुक्त आयोगाची बैठक होत आहे. (वृत्तसंस्था)