वॉशिंग्टन - पंतप्रधाननरेंद्र मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लीजन ऑफ मेरीट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. भारत आणि अमेरिकेतील भागिदारी आणि व्यवहार्यपूर्ण संबंधातील वद्धीसाठी केलेल्या नेतृत्वामुळे मोदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अमेरिकेत भारतीय राजदूत संधु तरनजीत यांनी हा पुरस्कार स्विकार केला, कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा विदेश दौरा शक्य नसल्यामुळे अमेरिकेतील भारतीय राजदूत संधु यांनी या पुरस्काराचा स्विकार केला.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिलंय की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लीजन ऑफ मेरीट पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. मोदींनी भारत देशाची जागतिक स्तरावर वेगळीच प्रतिमा तयार केलीय. तसेच, अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील संबंध मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे करण्यात मोदींच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच, यंदा हा पुरस्कार नरेंद्र मोदींना देण्यात येत असल्याचंही रॉबर्ट यांनी म्हटलंय.