अबुधाबी : सँडस्टोनचा वापर करून बनविलेल्या अबुधाबीतील पहिल्यावहिल्या मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, बुधवारी उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारपासून संयुक्त अरब अमिरातीचा दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे.आखातातील सर्वांत मोठ्या मंदिरासाठी भारतातून गंगा, यमुना यांचे पवित्र पाणी दोन मोठ्या कंटेनरद्वारे अबुधाबीत आणण्यात आले आहे. दोन्ही नद्यांचे पाणी मंदिराच्या दोन्ही बाजूंना प्रवाहित राहील, अशी रचना केली आहे. त्यात जिथे गंगा नदीचे पाणी साठविले जाणार आहे.
२७ एकर जागेत बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने अबु मुरेखा या भागात हे मंदिर उभारले आहे. २लाख घनफूट दगड मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधून ७०० कंटनेरमधून अबुधाबीला नेण्यात आला. वाराणसीला गंगा नदीच्या काठाप्रमाणे या मंदिरानजीक घाट उभारला आहे. भारतातून आणलेले गंगा, यमुना या नद्यांचे पवित्र पाणी अबुधाबी येथील मंदिराजवळ एका जलाशयात दोन विविध मार्गांनी एकत्रित करण्यात येते. संगम होतो तिथे विजेच्या दिव्यांद्वारे प्रकाशाचा झोत सोडण्यात आला आहे. तो झोत म्हणजे सरस्वती नदी असल्याची कल्पना करण्यात आल्याचे मंदिराचे विश्वस्त विशाल पटेल यांनी सांगितले.