बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडावे लागलेले असताना थायलंडमध्येही पंतप्रधानांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने बुधवारी पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना पदावरून हटविले आहे. एका नैतिकतेच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी शिक्षा झालेल्या नेत्याला थाविसिन यांनी मंत्रिपदावर नियुक्त केले होते. यावरून हा कारवाई करण्यात आली आहे.
मे महिन्यात पिचिट चुएनबान यांना पंतप्रधान कार्यालय मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यामुळे थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी संविधानाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे.