शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सुधारणार; सौदी अरेबियाचे राजकुमार प्रयत्न करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 4:20 PM

दिल्लीच्या आधी पाकिस्तानात जाणार सौदीचे राजकुमार, लष्करप्रमुखांना भेटणार

India Pakistan Relations, Saudi Arabia Prince जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणारे सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आता प्रथम पाकिस्तानला जाणार आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, सौदी राजकुमार 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या छोटाशा दौऱ्यावर येऊ शकतात. या दरम्यान सौदीचे राजकुमार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानातूनच सौदी राजकुमार नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. सौदी राजकुमारांची भारत आणि पाकिस्तानची ही भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा पाकिस्तानी विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भारताशी मैत्रीपूर्ण संबंधी प्रस्थापित करण्याबबत पाकिस्तानवर आखाती देशांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे हा दौरा भारत-पाकिस्तान मधील वैर कमी करण्याच्या दृष्टीने एक पाऊल ठरणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तान दिवाळखोरीच्या संकटात आहे आणि सौदी अरेबिया-यूएईच्या कर्जाच्या आधारे डिफॉल्टपासून वाचला आहे. सौदी अरेबिया आणि यूएई या दोघांनीही आता पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे की ते फुकटात पैसे देणार नाहीत. यामुळेच पाकिस्तानला युएई आणि सौदी अरेबियाला आपल्या राष्ट्रीय मालमत्तेतील हिस्सा विकावा लागला आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानमधील खाणीत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. एवढेच नाही तर ग्वादारमध्ये तेल शुद्धीकरण कारखाना बांधण्यासाठी सौदी अरेबिया सुमारे 3 अब्ज डॉलर्सची मदत देणार आहे.

सौदी आणि यूएईचा पाकिस्तानवर दबाव

यापूर्वी, सौदी अरेबिया आणि यूएईने गरीब पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची मदत दिली, ज्यामुळे IMF कडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनचे पत्रकार कामरान युसूफ यांच्या मते, हे देश आता भारतासोबतचे संबंध सामान्य करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणत आहेत. सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मैत्री सध्या एका नव्या उंचीवर आहे. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या वेळी भारताने सौदी अरेबियाला या संघटनेचे सदस्य बनविण्यास खुले समर्थन केले होते.

पाकिस्तानी पत्रकार रऊफ क्लासरा यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये आता नवाझ शरीफ यांचे सरकार स्थापन होत आहे. नवाझ शरीफ यांना लष्कराचा पाठिंबा असून आता भारतासोबतचे संबंध सुधारण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. नवाझ शरीफ हे सौदी अरेबिया आणि यूएईच्या अगदी जवळचे मानले जातात. यापूर्वी इम्रान खान यांच्या काळात भारतासोबतचे संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पीटीआय नेत्याच्या पक्षांतरामुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता त्याची जबाबदारी नवाझ शरीफ यांच्यावर टाकली जात आहे. नवाझ शरीफ आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध चांगले आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असा समज आहे की, पंतप्रधान मोदींसोबत जर कोणी संबंध सुधारू शकतं तर ते नवाझ शरीफ आहेत. पीएम मोदींनी यापूर्वी पंतप्रधान असताना नवाझ शरीफ यांच्या घरी भेट दिली होती. त्यामुळे आता भारत-पाक मैत्रीच्या दृष्टीने या साऱ्या घटना चांगल्या ठरू शकतात, असे बोलले जात आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारतPakistanपाकिस्तान