शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

जपानच्या ‘शाही’ लग्नाची ‘सामान्य’ गोष्ट !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 9:14 AM

Princess Mako of Japan : जपानचं राजघराणं सध्या अशाच एका कारणानं जगभरात चर्चेत आहे. जपानची तीस वर्षीय राजकन्या माको हिनं गेल्याच आठवड्यात राजघराण्याशी संबंधित नसलेल्या एका सर्वसामान्य तरुणाशी विवाह केला.

अलीकडच्या काळात जगात सर्वाधिक चर्चिली गेलेली लव्ह स्टोरी म्हणजे इंग्लंडच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांची. प्रिन्स हॅरीनं राजघराण्याशी संबंध नसलेल्या मेगनशी विवाह करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केवळ ब्रिटनमध्येच नाही, तर अख्ख्या जगभरात खळबळ  उडाली.  दोघांनीही हट्टानं लग्न केलं खरं, पण, ब्रिटनच्या शाही राजघराण्यानं मेगनला शेवटपर्यंत मनानं स्वीकारलं नाही. ब्रिटनच्या या शाही राजघराण्यातल्या कडेकोट किल्ल्यातून आजवर कोणतीही ‘रहस्य’ आणि ‘गुपितं’ यापूर्वी इतक्या सहजपणे बाहेर पडली नव्हती, पण, या काळात ती चावडीवर आली. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनीही राजघराण्यावर वार करायला मागेपुढे पाहिलं नाही.

ब्रिटनचं राजघराणं आणि त्यातील व्यक्ती त्यामुळे बराच काळ चर्चेत, वादात होत्या. मेगनचं आधीचं लग्न झालेलं असणं, तिचा घटस्फोट, त्यानंतर तिचं दुसऱ्या व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये असणं, चित्रपटांत काम करणं आणि त्याहीपेक्षा तिच्या मिश्र वंशामुळे तिला स्वीकारणं राजघराण्याला खूपच अवघड गेलं. शेवटी प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी ब्रिटनच्या राजघराण्याशी थेट आपले संबंधच तोडले आणि घरातून बाहेर होण्याचा निर्णय घेतला. शाही परिवारापासून स्वत:ला मुक्त करण्याचा अर्थ स्पष्ट होता, बलाढ्य राजसत्तेच्या उत्तराधिकारांपासून वंचित होणं आणि त्याचवेळी राजघराण्याच्या प्रोटोकॉलच्या सक्तीतूनही मुक्ती मिळवणं..

जपानचं राजघराणं सध्या अशाच एका कारणानं जगभरात चर्चेत आहे. जपानची तीस वर्षीय राजकन्या माको हिनं गेल्याच आठवड्यात राजघराण्याशी संबंधित नसलेल्या एका सर्वसामान्य तरुणाशी विवाह केला. माको आणि तिचा प्रियकर केई कोमुरो हे गेली अनेक वर्षे प्रेमात होते. इतकंच नव्हे, सप्टेंबर २०१७ मध्ये साखरपुडा करुन आपल्या लग्नाची घोषणाही त्यांनी केली होती. या घटनेमुळे जपानच्या राजघराण्यात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये खूपच खळबळ उडाली. त्यानंतर केई कोमुरोच्या आईचा एक आर्थिक घोटाळा चर्चेत आल्यानंतर हे प्रकरण आणखीच चिघळलं. वादांच्या गदारोळामुळे हे लग्न त्यावेळी स्थगित करण्यात आलं. 

माको ही सम्राट नारुहितो यांची भाची आहे. टोकियोच्या ‘इंटरनॅशनल क्रिश्चियन युनिव्हर्सिटी’मध्ये माको आणि केई कोमुरो सोबत शिकत होते. त्याचवेळी त्यांचं एकमेकांवर प्रेम बसलं. पण, या घटनेमुळे वादळ उठल्यानंतर काही काळानं कायद्याच्या शिक्षणासाठी माको न्यूयॉर्कला गेली. गेल्याच महिन्यात ती तिथून परत आली आणि त्यानंतर लगेच तिनं विवाहाचा निर्णय घेतला. या विवाहावरुन जपानमध्ये अजूनही चर्वितचर्वण सुरू आहे. राजघराण्याबरोबरच अनेक सर्वसामान्य लोकांनाही माकोची ही कृती पसंत पडलेली नाही, पण, माको आपल्या निर्णयावर ठाम होती. या निर्णयाची जबर किंमतही तिनं चुकवली आहे. सर्वसामान्य व्यक्तीशी विवाह केल्यामुळे राजघराण्याचा तिचा शाही दर्जा आणि तिला मिळणारे आर्थिक लाभ आपोआपच रद्द झाले आहेत. कारण जपानच्या राजघराण्याचा तसा नियमच आहे. त्यामुळे मोठ्या संपत्तीवरही तिला पाणी सोडावं लागलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व नुकसानाला तिनं संमती तर, दिलीच, पण, लग्नात राजघराण्याकडून भेट म्हणून मिळणाऱ्या १४ कोटी येन (१२.३ लाख डॉलर) इतक्या प्रचंड रकमेला स्वत:हूनच नकार दिला. तिच्या या धाडसाचंही अनेक जण कौतुक करीत आहेत.  

माको आणि केई कोमुरो यांना आता जपानचे ‘हॅरी आणि मेगन’ म्हटलं जात आहे. अर्थात माको ही राजघराण्याचा त्याग करणारी जपानमधील पहिली व्यक्ती नाही. तिच्या आधी तिची मावशी सायाकोनंही २००५ मध्ये योशिकी कुरोडा या नगरनियोजकाशी लग्न केलं होतं. पण, या राजघराण्यात १९५९ मध्ये झालेलं एक लग्न सर्वाधिक गाजलं होतं. त्यावेळी सम्राट  आयकिहितोनं मिचिको या एका सर्वसामान्य तरुणीशी विवाह केला होता. पण, हा विवाह राजघराण्यानंच नाही, तर, जनतेनंही स्वीकारला होता. लोक प्रेमानं तिला ‘मिचो’ म्हणत. जपान ‘आधुनिक’ होत असल्याचं ते प्रतीक मानलं गेलं होतं. 

राजघराण्याच्या परंपरा खूप कडक असतात. त्यातली एक प्रथा होती, शाही घराण्यातील महिलांनी पुरुष सदस्यांच्या काही पावलं मागे राहूनच चालणं. काळाच्या ओघात हा नियम आता राजघराणंही पाळत नाही, पण, २६०० वर्षांची परंपरा असलेल्या या राजघराण्याचे प्रोटोकॉल अजूनही कडकच आहेत. त्यातील एक विचित्र नियम म्हणजे राजघराण्यातील कोणत्याही पुरुषानं सर्वसामान्य महिलेशी विवाह केला, तर, राजघराण्याचा उत्तराधिकारी म्हणून त्याचा अधिकार संपुष्टात येत नाही. राजघराण्यातील महिलेनं मात्र असा विवाह केला, तर, तिचे सारे शाही अधिकार गोठवले जातात. 

लोकांनी ‘ट्रोल’ केल्यानं आलं होतं नैराश्य! २०१७ पासून सुरू झालेलं माकोचं प्रेमप्रकरण ती न्यूयॉर्कला गेल्यानंतरही लोक आणि माध्यमं विसरली नव्हती.  माध्यमांमध्ये तिच्याविषयी बऱ्यावाईट बातम्या येतच होत्या. सोशल मीडियावरही तिला ट्रोल केलं जात होतं, त्यामुळे ताण-तणाव आणि नैराश्यालाही तिला सामोरं जावं लागलं, पण, शेवटी आपल्या प्रेमासोबतच राहण्याचा निर्णय तिनं घेतला.  आता पुढचं आयुष्य तरी तिला ‘शांततेत’ घालवता येईल..

टॅग्स :Japanजपानrelationshipरिलेशनशिप