बीजिंग : भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या पहिल्या चीन दौऱ्यास प्रारंभ करताना चिनी समपदस्थ जनरल चांग वानक्वान यांच्याशी सोमवारी चर्चा केली. चीनसोबतच्या संबंधांना भारत सर्वोच्च प्राधान्य देतो व हे संबंध वृद्धिंगत करण्यास तो बांधील आहे, असे पर्रीकर म्हणाले. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांची चर्चा सुरू होण्यापूर्वी चांग आणि पर्रीकर यांनी चर्चा झाली.‘दहशतवादाबाबत दुटप्पीपणा नको’मॉस्को : दहशतवादाबाबत दुटप्पी भूमिका घेणे सुरूच ठेवले तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा भारताने सोमवारी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिला. त्याचबरोबर या संकटावर दणकट जागतिक कृतीची मागणीही केली. आरआयसीच्या (रशिया-भारत-चीन) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, दहशतवादाविरुद्धच्या लढ्याचे समूहाद्वारे नेतृत्व करायला हवे. जैश ए मोहंमदचा प्रमुख मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रसंघामार्फत दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत चीनने खोडा घातल्याच्या पार्श्वभूमीवर स्वराज यांनी वरील इशारा दिला. तत्पूर्वी स्वराज यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासमक्षही हा मुद्दा उपस्थित केला होता. भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट तळावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याचा मसूदच सूत्रधार असल्याचा भारताचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)
‘चीनसोबतच्या संबंधांना प्राधान्य’
By admin | Published: April 19, 2016 3:17 AM